नाशिक| ९४ साहित्य संमेलनास १६ लोकप्रतिनिधींनी दिली मदत केली आहे, साहित्य संमेलनास आपल्या आमदार निधीमधून पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निलम गोऱ्हे, डॉ.सुधीर तांबे, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, दिलीप बोरसे अशा १६ लोकप्रतिनिधींनी साहित्य संमेलनास मदत आहे दिली. त्यासोबच इतर ही व्यक्ती संस्थांनी साहित्य संमेलनाला मदत केली आहे.
नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष तथा रामबंधु मसाले समुहाचे हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेच्यावतीने सात लाख रुपये व राम बंधु मसाले समुहाकडून ३ लाख अशी एकूण १० लाखाची मदत संमेलनासाठी जाहिर केली. तसेच संदिप फांउडेशने २०० व भुजबळ नॉलेज सिटी संस्थेने २०० पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सुर्या, हॉटेल हॉलीडे ईन, हॉटेल एमराल्ड पार्क यांनी देखील येणाऱ्या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
