नाशिक| जगद्गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरासाठी शासनाकडून पर्यटन विकास महामंडळाकडून 25 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा अशी ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे यांनी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रंबकेश्वर हे इतर संस्थान पेक्षा उपेक्षित राहिलेले आहे. या संस्थांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराचा जिर्णोध्दारा संदर्भात शासनाकडून भरीव निधी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, तरी आपण या कामासाठी शासनाकडून कमीत कमी 25 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या संस्थानचा पंढरपूर, आळंदी, शिर्डी संस्थानच्या धर्तीवर विकास करता येईल.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी व महाराष्ट्राबाहेरील वारकरी यांची अपेक्षा आहे.
यामुळे पर्यटनाला चालना मिळेल त्रंबकेश्वर या नगरीचाही विकास होण्यास मदत होईल याठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या प्रमाणेच आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे या ठिकाणी आहे यामुळे या अवस्थांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आपणास महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहोत असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नाशिक तालुका कार्याध्यक्ष आणि उतर महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य ह.भ. प. निवृत्ती महाराज कापसे यांनी निवेदनात केली आहे.


