नाशिक| कुसुमाग्रजांचे साहित्य हे दीपस्तंभासारखे असून आरोग्य शास्त्राचा विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन आणि अनुभव घेतला पाहिजे असे प्रतिपादन कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कुसुमांजली या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. या प्रसंगी डॉ. चव्हाण बोलत होते.
विद्यापीठातर्फे कोविड परिस्थितीमुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन झाला. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक श्री संजय गीते यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गीत सादर केले. त्यांच्याशी मुलाखतीद्वारे साहित्याचा रसास्वाद आणि कवितांचे व स्वगताचे अभिवाचन संवादक डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, साहित्य व्यक्तिमत्व विकास करत असतो त्यामुळे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण यू ट्यूब चॅनल वरून करण्यात आले आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगीतले.
याप्रसंगी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी श्री. नरहरी कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, विधी अधिकारी श्री. संदीप कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर, डॉ. चित्रा नेटारे, श्री. संजय मराठे, श्री. संदीप राठोड, श्रीमती सविता कुलकर्णी, श्रीमती मीना अग्निहोत्री उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. संजय नेरकर यांनी बहारदार गायन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मधुकर भिसे, श्री. सचिन धेंडे, श्री. दिप्तेश केदारे, श्री. डी. एन. भामरे, यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री. नाना परभने यांनी ध्वनी व प्रकाश संयोजन केले. श्री विनायक ढोले यांनी चित्रीकरण केले. श्री मामा राजपूत, श्री. राजेंद्र बागुल, श्री. पांडुरंग गांगुर्डे, यांनी परिश्रम घेतले.

