रानवड साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ:आ. दिलीपराव बनकर; बनकर पतसंस्थेच्या हाती सूत्रे आल्याने रासाकाला मिळणार नवसंजीवनी
संतोष गिरी
निफाड| रासाकाला पूर्वीसारखेच गतवैभव प्राप्त करून देऊन कर्मवीरांचे थांबलेल्या विकास चक्राला गती देण्यासोबतच पुढील लक्ष निसाकावर केंद्रित करत त्याला पुनर्वैभव प्राप्त देण्यासाठी प्रयत्नशील आहे,असे सांगून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी जात-पात, गट-तटला मूठमाती देऊन एकत्र येण्याचे आवाहन केले निफाडचे विकास पुरुष आ. दिलीपराव बनकर यांनी केले.
गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी आज रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आपले एक पाऊल पुढे टाकत कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत तालुक्यातील ऊस उत्पादक व कामगार यांची सभा घेत रासाका अधिकृतरित्या स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेने ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या काव्यपंक्तीला अनुसरून २०१९ विधानसभा निवडणुकीत नामदार अजितदादा पवार यांनी निफाड येथे दिलेला शब्द रासाका व निसाका दिलीप बनकर आमदार झाल्यास सुरू करू हे वाक्य सत्य करत दिलीप बनकर यांनी अथक प्रयत्नातून दीड वर्षाच्या तपश्चर्ये नंतर रासाकाची निविदा टेंडर प्रक्रिया व कहा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावत रासाका ताब्यात घेतला
आज खऱ्या अर्थाने रासाका कार्यस्थळावर स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ व तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ऊस उत्पादक, कामगार, ट्रक चालक-मालक, व्यवसायिक आदींना बरोबर घेऊन कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पुतळ्याला अभिवादन काकासाहेब वाघ यांच्यासोबत काम केलेले रानवडचे वयोवृध्द ऊस उत्पादक व सभासद भीमराव वाघ यांच्या हस्ते, करत खऱ्या अर्थाने पंधरा वर्षाची आपली वाटचाल कशी असणार हेच आपल्या कृतीतून व छोटेखानी भाषणात जनतेपुढे मांडल्याने रासाका कार्यस्थळावर जी काही मरगळ काही काळापासून आली होती की मरगळ बनकर यांनी आपल्या भाषणातून झटकून टाकल्याचे चित्र जनतेच्या चर्चेतून दिसून आले.
आ. बनकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की अनेकदा अडचणींचा काळात तालुक्यातील काही तथाकथित राजकीय व सामाजिक लोकांनी आपल्या वाटेत काटे टाकण्याचे काम केले, तालुक्यातील सक्षम असणाऱ्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणा की, अशोकराव बनकर पतसंस्थेला रासाका मिळू नये म्हणून प्रयत्न केले. परंतु साखर उद्योगाचे सर्वसेर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व तालुक्यातील कर्मवीरांच्या या संस्थेवर प्रेम करणाऱ्या राजकीय मंडळींनी आपल्याला मदत केल्याने आजचा हा दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळाला असून, ज्ञात अज्ञात सर्व लोकांचे आभार मानत इथून पुढील काळात रासाकाला गतवैभव मिळवून देऊन कर्मवीरांच्या या बंद पडलेल्या विकास रुपी चुली सुरू करून असे सांगून तालुक्यातील थांबलेल्या विकासाला चालना मिळून देण्यासाठी पक्ष, गट तट जात-पात या सर्वांना मूठमाती देत कर्मवीरांच्या त्यागातून या उभ्या राहिल्या संस्थांना सर्वांनी साथ देण्याचे आव्हान आपल्या भाषणात आमदार बनकर यांनी उपस्थितांना केले.
रासाका सुरू करून आपण थांबणार नसून रासाका बरोबरच पुढील लक्ष निसाका असणार असल्याने निसाका हा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू करणार असल्याचेही बनकर यांनी सांगितल्याने ऊस उत्पादकांनी एकच जल्लोष केला कारण की तालुक्यातील या दोन्ही विकास रुपी संस्था काही काळापासून बंद असल्याने तालुक्याचा आर्थिक कणाच आर्थिक व सामाजिक विकास थांबला आहेे, तो भरून निघण्यास मदत होणार असल्याचे बनकर यांच्या या भाषणाने जनतेमध्ये उत्साह जाणवत होता तसेच आज सकाळी दहा वाजता ढोल-ताशांच गजरात दिलीप बनकर यांचे आगमन पिंपळगाव येथून निघून नांदुर्डी येथील वरद विनायक गणपती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून रानवड येथील रानवडकरांचा सत्कार स्वीकारताना रासाका कार्यस्थळावर बनकर यांचे आगमन तालुक्यातील सर्व राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थित झाली आगमना बरोबर फटाक्यांची व गुलालाची उधळण रासाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक व कामगारांच्या वतीने करण्यात येऊन तर सर्वप्रथम कर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते केले.
तर अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, रासाकाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे, शंकरराव कोल्हे खेडेकर, मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, निसाका चे माजी अध्यक्ष तानाजी बनकर,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, जिल्हा परिषद सदस्य डी के नाना जगताप, सिद्धार्थ वनारसे ,सुरेश कमानकर, मंदाकिनी बनकर,काँग्रेस काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, पिंपळगाव सरपंच अलका बनकर, ॲड नितीन ठाकरे, भाग्यश्री पत संस्थेचे अध्यक्ष रमेश चंद्र घुगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, निफाड पंचायत समिती माजी सभापती सुभाष कराड, स्माईल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य वाघ,रासाका ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाघ, सहकार नेते राजेंद्र मोगल, हरिश्चद्र भवर ,शिवाजीराजे ढेपले बाळासाहेब बनकर ,चंद्रकांत राका, रासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे व सदस्य, रासाका कामगार संघटनेच्या वतीने अशोक कुशारे, बळवंत जाधव, उत्तम रायते, सुधाकर धाराराव, मांजरगाव सोसायटी सभापती गणपत हाडपे ,पिंपळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कादरी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला आदींसह तालुक्यातील ऊस उत्पादक कामगार सभासद व कर्मवीर कर्मवीरावर प्रेम करणारे जुनेजाणते वयोवृद्ध सह नागरिकांचे तरूण उपस्थित होते.
तालुक्याच्या थांबलेल्या विकासाला चालना मिळेल
आज स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेने रासा का ताब्यात घेतल्याने खऱ्या अर्थाने तालुक्यातील थांबलेला विकासाला चालना मिळणार असल्याचे उपस्थित ऊस उत्पादक कामगार यांच्या उपस्थितीत व बोलण्यातून जाणवले सक्षम संस्थेला रासाका चालवण्यास दिल्याने ऊस उत्पादकांना व कामगारांना निश्चितच न्याय मिळेल कारण की आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व अशोकराव बनकर पतसंस्थेचा कारभार जनतेसमोर असल्याने तालुक्याचा थांबलेला विकास रथ पंधरा वर्षासाठी बनकरांनी निश्चितच न्याय देऊन तालुक्यात परत एकदा थांबलेला आर्थिक विकासात पुढे नेण्याचे काम करतील.
प्रताप निकम, ऊस उत्पादक सभासद नांदुर्डी
आ. बनकरांमुळे कामगारांना न्याय मिळाला
गत चार वर्षापासून थांबलेलं विकास चक्र आमदार बनकर यांच्या प्रयत्नात सातत्य प्रयत्नाने सुरू होणार असल्याने अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम बनकरानी केल्याने कामगारांना न्याय मिळेल यात शंका नाही परंतु रासाका परिसराचे रूकडे बनकर यांच्या दूरदृष्टीतून निश्चित बदलणार यात शंका नाही.
अशोक कुशारे अध्यक्ष रासाका कामगार संघटना





