इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा रास्ता रोको
नाशिक| विंचूर| पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाले.
पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी घरगुती गॅसचे भाव वाढल्यावर टीव्हीवर येऊन गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे ओरडून सांगणाऱ्या त्या काकू आता गॅसचे दर ७२५ रुपये इतके झाले तरी त्या अजून टिव्हीवर दिसत नाहीत. त्या काकू कुठे गेल्या ते शोधावे लागेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव ९५ रुपये तर डिझेलचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल देखील अॅड. पगार यांनी यावेळी बोलतांना केला.
एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, भाऊसाहेब भवर, बबनराव शिंदे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या नुतन आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, योगेश पाटील, ना. छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पांडुरंग राऊत, राहुल सालगुडे, प्रफुल पवार, भुषण शिंदे, राजेंद्र बारगुडे, सचिन दरेकर, संतोष राजोळे, अनिल सोनवणे, ललित दरेकर, आत्माराम दरेकर, स्माईल मोमीन, मंगेश गवळी, अर्षद शेख, सोहेल मोमीन, महेश मेथे, शिवाजी सुपनार, दत्ता रायते, रंजीत गुंजाळ, दत्ता डुकरे, मोसिन शेख, जयंत साळी, विलास गोरे, अविनाश सालगुडे, सुनिल आहेर, दत्ता वाघचौरे, शाम हिरे, ललित निकम, किरण भोसले, मोसिन शेख, अविनाश सालगुडे, मधुकर गावडे, नानासाहेब जेऊघाले, रामकृष्ण दराडे, बाळासाहेब पुंड, अशोक नागरे, संतोष राजोळे, जयंत साळी. अनिल विंचूरकर, अशोक गोसावी, विलास गोरे, सचिन वाघ, महेंद्र पुंड, तौसिफ मनियार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
फोटो ओळी - पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार समवेत पुरुषोत्तम कडलग, जयदत्त होळकर, भाउसाहेब भवर, राजेंद्र डोखळे, साहेबराव मढवई, बबनराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, ज्ञानेश्वर शेवाळे, सोहेल मोमिव आदी दिसत आहेत.




