आरोग्य विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय केंद्र प्रशासकीय इमारतीचा १६ फेब्रुवारीला शिलान्यास, ना.अमित देशमुख यांची उपस्थिती
औरंगाबाद| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व विविध प्राधिकरण सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या सेक्टर एन 2 , सर्व्हे क्रमांक 60, मुकुंदवाडी येथे औरंगाबाद विभागीय केंद्राची ईमारत होणार आहे. येथेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ध्येय: शून्य टक्के रॅगिंग या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ताींना विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्शी वैद्यकीय विद्याशाखेतील जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरुण महाले, डॉ. इंदुप्रकाश गजभिये, डॉ. शरद कोकाटे यांना तर दंत विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. रमेश गांगल यांना तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. अरुण भस्मे यांना देण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे प्रशासकीय केंद्र सक्षम करण्याचे काम विद्यापीठाकडून सुरु आहे. तरीही या समारंभास सर्वांनी मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले आहे.
