निफाड |मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या मार्फत पत्रकारिता, कृषी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात येते.यातील राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२१ पुरस्कारासाठी महाराष्ट्र गुणरत्न अवार्ड या करिता दैनिक आपलं महानगरचे निफाड तालुका प्रतिनिधी संतोष राजगिर गिरी यांना मंगळवारी नाशिकस्थित औरंगाबादकर सभागृहात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, जबाबदारीचे भान ठेवत पत्रकारिता करणाऱ्या संतोष गिरी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे व विश्वस्त मीनाक्षी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.स्वामी श्रीकंठानंदजी, साहित्यिक रमेश आव्हाड मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सुरेंद्र सोनवणे, दैनिक सकाळचे पत्रकार विजयकुमार इंगळे, मानव धन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष एल .एस. दाते कार्याध्यक्ष शशिकांत सेलूकर, शिक्षण तज्ञ मनीषा कदम, मानद सल्लागार प्रकाश सावंत प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत गावंड अमोल सुपेकर आदींसह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यमं पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, महासचिव विलास पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष दिगंबर मराठे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड माजी आमदार अनिल पाटील कदम ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णाताई जगताप, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर, पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर, सारोळे खुर्दचे सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे आदींनी राज्यस्तरीय पत्रकार क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल आदींनी अभिनंदन केले आहेत.


