प्रत्येकाच्या स्वप्नातलं मनातलं आणि भारतीय लोकांची देवभूमी म्हणजेच केरळ! आम्ही नाशिक ते एर्नाकुलम(कोची) मंगला एक्सप्रेस रेल्वेने निसर्गाच्या सुंदर सानिध्यात घेतलेली ही अविस्मरणीय सहल..
एर्नाकुलम (कोची) येथे आम्ही सकाळी 10 वाजता पोहचलो व फ्रेश होऊन आम्ही कोची साईट सीनसाठी निघालो, आम्ही तेथे चर्च, पैलेस बघितले. तसेच आम्ही मच्छी मार्केट, कथकली नृत्य शैली, संग्रहालय बघून आम्ही मॅरीने ड्राईव्ह या ठिकाणी गेलो.. तेथे अप्रतिम असे सुंदर दृश्य होते, केरळच्या फेमस असा लु-लु मॉलला जाऊन केरळी मसाले मोठ्या प्रमाणात खरेदी केले तसेच या ठिकाणी तेथील पारंपारिक कथकली नृत्य अनुभवले आणि कोची येथे मुक्काम केला.
प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच कोची ते मुन्नार. आम्ही 140 km असा ४-५ तासांचा प्रवास केला... प्रवास करताना डोळ्याच्या नजरेत मावणार नाही असे रस्त्याने चहा, कॉफी, मसालेचे मळे बघण्यास मिळाले, मुन्नर हे हिल स्टेशन आहे, मुन्नर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. परिसरात थंडी आणि दाट धुकं यामुळे माटुंप्पेट्टी धरण येथे बोट रायडिंगला फार मजा आली. तसेच इको पॉईंट बघण्यासारखा आहे, येथे 3 बाजुंनी डोंगर आहे तेथे आवाज दिल्यातर 4 बाजूनी फेकतो परत आपल्याला ऐकू येतो तसेच चहाचे संग्रहालय देखील बघण्यासारखे आहे. तसेच हत्ती जंगलात 5 किलोमीटर सफारी करण्यात आली, मुन्नर येथे रात्री शॉपिंग करण्याची मजाच काही वेगळी आहे, येथे चहा,कॉफी, चॉकलेट खूप फेमस आहे येथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला.
आता आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच मुन्नर ते पेरियार (टेकडी) डोंगर भागातून 100 km असा प्रवास करत येथे पोहचलो, याठिकाणी नॅशनल जंगल पार्क खूप छान होते, या पार्कला जाण्यासाठी जीपने पाण्यातून प्रवास करावा लागतो येथे अनेक वन्य आणि जलचर प्राणी बघण्यास मिळाले, या जंगलात आदिवासी गाव खूप सुंदर बघण्यास मिळाले येते आम्ही 1 दिवस मुक्काम केला.
त्यानंतर पेरियार ते त्रिवेंद्रम 190 km प्रवास करत आम्ही केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे पोहचलो. कोवलम बीच येथे गेलो असेच येथे लाईट हाऊस आहे तेथून सूर्य मावळताना खूप सुंदर दृश्य दिसते.. तेथे आर्ट गॅलरी आहे तिथे अतिशय सुंदर बोलके खरे दिसणारे मेणाचे पुतळे तेथे पाहिले त्रिवेंद्रममध्ये सर्वात प्राचीन ऐतिहासिक ओळख असलेल श्री पद्मनाभस्वामी मंदिर येथे गेलो. या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि तेथील रहस्य हा एक चर्चेचा विषय आहे. परंतु सुंदर नक्षीकाम आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल, या मंदीराचे सौंदर्य रात्री खुलून दिसते, या मंदीरमध्ये स्त्री ने साडी परिधान करणे आणि पुरुषाने लुंगी घालणे बंधन कारक आहे. त्रिवेंद्रम जवळ बोट जंगल सफारी केली या बोटीतून प्रवास करताना डायनोसार पिक्चरची आठवण आली या बोटीतून प्रवास करताना दोन्ही बाजूनी व वरतुन झाडे झुडपे त्यामध्ये बोट प्रवास सुरू होता. तो प्रसंग अप्रतिम होता, त्रिवेंद्रममध्ये आम्ही 2 दिवस होतो.
आमच्या या देवभूमीतील एन्जॉय करण्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच त्रिवेंद्रम ते अल्लपी! 150 km प्रवास करत अल्लपी हाऊस बोट या ठिकाणी पोहचलो, आम्ही एक संपूर्ण दिवस या बोटमध्ये राहिलो. या बोटमध्ये राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था हॉटेल सारखी असते, ही बोट नदी खाडीतून प्रवास करत असते, या बोटीच्या बाहेरचा नजरा खूप अविस्मरणीय असा आहे. नदी बाजूला सुंदर अशी घरे, नारळाची झाडे, आजू बाजूला बोट बघणास आलेले, आम्ही एक रात्र या हाऊस बोटवर राहिलो. केरळ टूर केली तर एक दिवस हाऊस बोटचा प्रवास पाहिजे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 50 km प्रवास करत कोची या ठिकाणी येऊन आम्ही परतीचा प्रवास केला. अशाप्रकारे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक असणाऱ्या केरळला आम्ही भेट देऊन आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवांमध्ये वाढ केली.
अभिजित श्यामराव भोसले,
संचालक,सद्धम्म टूर्स अँड ट्रॅव्हल्स
9762439524/8788429281


