सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात धान्य वितरणासाठी दुकानदारांचे थम ठेवा: रेशन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाशिक| देशात तसेच संपूर्ण राज्यात करोनाने थेमान घातले आहे. राज्यात ५२००० हजार व जिल्हातील २६०० रेशन दुकानदारांच्या दारापर्यंत कोरोना आला आहे. थममुळे कोरोना संक्रमणाचा धोका दुकानदारांना संभवतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोनावर नियंत्रण मिळेपर्यंत दुकानदारांचे थम घ्यावे अशी मागणी रेशन संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
संपूर्ण शासकीय यंत्रणा करोनाशी दोन हात करण्यात गुंतली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. हॉस्पीटल फुल्ल झाले आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही. तरी देखिल डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आज राज्यात १०० च्यावर रेशन दुकानदार मृत्यूमुखी पडले. त्यांचे कुंटुब उघड्यावर पडले आहे. शासनाने मदत तर सोडा पण शासनाने साधी सहानभूती ही दाखवली नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकानदारांचे थम ठेवावे अशी मागणी रेशन संघटनेने केली.
ही खेदाची बाब म्हणावी लागेले, इतरत्र गर्दी नको शासन म्हणत आहे. आणि रेशन दुकानात हजारो कार्डधारकांचा थम घ्या म्हणत आहे. केंद्र व राज्य सरकाला अस वाटत आहे. रेशन दुकानदाराला कोरोना होणार नाही. आज प्रत्येक गावात कोरोना पॉझिटीव संख्या वाढत आहे. बरेच कार्डधारक घाबरू गेले आहेत. त्याचा परिणाम वाटपावर होणार आहे. पॉझिटीव व्यक्तीचा थम कसा घेणार त्याच्या कुटुंबाचा तरी कसा घ्यावा. काही लोकांचा थम मॅच होत नाही, फार अडचणी आहे. दुकानदार ही शेवटी माणूस आहे. हा विचार शासनाने करावा अन्याथा पुढील मे महिन्यात कोणीही दुकानदार धान्या वाटपाच्या मनस्थितीत राहणार नाही. शासनाने याचा विचार करावा.
केंद्र सरकारने व राज्या सरकारने याचा विचार करुन करोना प्रार्दुभाव कमी होईपर्यंत थम शिथिल करावा अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे केली आहे, म्हणून शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे अन्यथा कोणीही वाटप करणार नाही, सरकारनं गाभीर्याने विचार अशी मागणी नाशिक जिल्हाध्यक्ष निवृती महाराज कापसे तथा राज्य उपाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील व इतर पदाधिकारी, सदस्यांनी केली आहे.
