नाशिक| कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांनी रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना प्रणित भारतिय विद्यार्थी सेनेच्या वतीने आवाहन केल्यानंतर 50 हून अधिक जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे,असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हे रक्तदान शिबिर पार पडले.यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सर्वानी वर्षातून दोन किंवा तीनवेळा रक्तदान केले तर रक्ताचा देशात कुठेच तुटवडा जाणवणार नाही आणि रुग्णांनाहीं जीवदान मिळेल,असे खा.हेमंत गोडसे आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी सांगितले.
यावेळी महानगर संघटक योगेश बेलदार,विधानसभा संघटक विरेंद्र सिंग टिळे,गुड्डीताई रंगरेज, भारतीय विद्यार्थी सेना महानगर संघटक रवींद्र आव्हाड, श्रीकांत मगर, उपजिल्हासंघटक स्वप्नील जाधव,नीलेश पाटील,यशकुमार जानेराव,ओमकार कंगले,करण सूर्यवंशी, राहुल सानप,संजय गोसावी, तालुकासंघटक कुणाल ठाकरे, महानगर प्रसिद्धी संघटक भरत थेटे, अजय तिवारी,संदीप मते,भाग्येश निकम, रोहन दिवे, विजय कुमावत,आदित्य जोशी, उद्धव गांगुर्डे, महेश मते,सुरज दमकोंडे,प्रथमेश भांगरे,अक्षय बोराडे, उमेश धनगर,रोहित पवार,विशाल शिंदे, दुर्गेश भांगरे,समाधान मुंडे,संकेत देवळेकर, ओमकार कापडणीस, अभिजीत साबळे, दस्तगीर रंगरेज, सचिन धोगडे आदींसह भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

