मुंबई |कोरोनाची गंभीर परिस्थिती बघता इ. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मंत्री मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत, याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
