Skip to main content

आरोग्यसेविकांना अखेर पदोन्नतीचा लाभ

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागा मार्फत १५ आरोग्य सेविका यांना पदोन्नती मिळून आरोग्य सहाय्यीकापदी विराजमान झाल्या आहेत. बरेच दिवसापासून आरोग्यसेविका पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर दिनांक २१मे, २०२१ रोजी प्रतिक्षेतील आरोग्यसेविका यांना  आरोग्य सहाय्यीका झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नियमित पदोन्नती प्रक्रिया अंतिम करणेकामी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड(भाप्रसे), मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व सहाय्यक प्रशासन अधिकारी  प्रकाश थेटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल गीते, सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे पदोन्नती झालेल्या आरोग्यसेविका भगिनी यांनी आभार मानले आहे.
Happiness among promoted health workers!
फोटो: फाईल

पदोन्नती झालेल्या आरोग्यसेविका यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दूरध्वनी करुन रिक्त पदावर इच्छेनुसार पदोन्नती पदास्थापणा दिली त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे. कोरोना साथरोग काळात पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत असतांना पदोन्नती देऊन आमच्या आरोग्य सेविका भगिनींचा सन्मान केला अशा भावना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा शोभाताई खैरनार यांनी व्यक्त केल्या आहेत.

पदोन्नती झालेल्या आरोग्य भगिनींचे  नर्सेस संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मधुकर आढाव, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे संचालक बाळासाहेब ठाकरे, दीपक आहिरे, आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय सोपे, राजेंद्र बैरागी, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पगार, बाळासाहेब कोठुळे, श्रीकांत आहिरे यांनी अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत._

लेखन:- जी.पी.खैरनार, नाशिक

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...