नाशिक| सद् धम्म टूर्स आणि ट्रॅव्हलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बुद्ध पौर्णिमा निमित्त प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यात चेंबूरच्या सुवर्णा सोनवणे प्रथम, तर व्दितीय गोरेगाव येथील सुधाकर मगर, तृतीय यवतमाळचे राजू पाटील हे विजेते ठरले.
बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून सद् धम्म हॉलिडेतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध ह्यांच्या प्रतिमेला पुष्प व दिप प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेतले, तसेच प्रश्नावलीचा निकाल लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आला.
विजेत्यांचे नावे पुढील प्रमाणे
प्रथम विजेता - सुवर्णा सोनवणे (चेंबूर)
द्वितीय विजेता - सुधाकर मगर (गोरेगाव)
तृतीय विजेता - राजू पाटील (यवतमाळ)
उत्तेजनार्थ
प्रथम रसिका सतीशकुमार जामशेतकर (पनवेल), द्वितीय कल्पना जनबंधु (अमरावती) असे आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येऊन सभासदांनचे ही आभार संयोजकांनी मानले. ज्या ज्या सभासदांनी या स्पर्धेत भाग घेतल्या त्या सर्व सभासदांना बुद्धगया धम्म यात्रे मध्ये १०% सूट असेल असे सद् धम्म टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक अभिजीत आणि सम्राट सोनवणे यांनी सांगितले.
