नवी दिल्ली| भारतात सलग सहाव्या दिवशी, दैनंदिन बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक झाली असून गेल्या 24 तासांत 3,89,851 रुग्ण बरे झाले. त्यामुळे भारतात कोविडमुक्त झालेल्याची एकूण संख्या आज 2,19,86,363 वर पोहोचली आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर 86.23% पर्यंत पोहोचला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 1,27,046 ने घट झाली आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.94% दहा राज्यातील आहेत.
भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन रुणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी 74.46% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक नवीन 33,059,रुग्ण आढळले आहेत, त्याखालोखाल केरळमध्ये 31,337 नवीन रूग्ण आढळले आहेत.
आता देशातील एकूण पॉझिटिव्ह रूणांपैकी 12.66% रूग्ण सक्रीय आहेत. देशाच्या एकूण सक्रिय रुणांपैकी 69.02% रुग्ण 8 राज्यातील आहेत. गेल्या 24 तासांत 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या (ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त चाचण्या झालेली संख्या आहे. हा जागतिक विक्रम आहे. आतापर्यंत देशभरात 32 कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.तर दैनंदिन पॉसिटिव्हिटी दर घसरून 13.31% वर आला आहे.
सोर्स:पीआयबी मुंबई

