नाशिकरोड| प्रतिनिधी| अन्न सुरक्षा योजना व इतर महत्त्वाच्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी रेशनकार्डला अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. शासनाकडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतीसाठी रेशनकार्डचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमा रवि पगारे यांनी केले.
उपनगरमध्ये मातोश्रीनगर येथे युगांतर संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रेशनकार्ड वाटप करण्यात आले. पक्षातर्फे माहे फेब्रुवारी महिन्यात उपनगर मध्ये रेशनकार्ड शिबिर घेण्यात आले होते. त्यात नवीन रेशनकार्ड नोंदणी आणि जुन्या रेशनकार्डात काही दुरुस्ती करणे, याकामासाठी नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यादुरुस्ती झालेल्या रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. राज्याचे अन्न-धान्य नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माहे फेब्रुवारी महिन्यात रेशनकार्ड शिबिर राबविण्यात आले होते. शिबिरात ज्या नागरिकांनी नवीन रेशनकार्डसाठी नोंदणी केली होती, त्यांच्या कार्डचे लवकरच वाटप केले जाईल, असेही सौ पगारे म्हणाल्या. सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून कार्यक्रम झाला. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रेशनकार्ड वाटप करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी शंकर रामचंद्रन, दीना दगुजी कदम, पुंडलिक वामन क्षिरसागर, राधेश्याम ज्ञानीराम नाथेकर, मनीषा प्रदीप इंगळे, जीवन कमलाकर दाणी, सचिन अच्युतराव घोडके, प्रदीप चंद्रकांत अहिरे, तिलबहादूर काली खत्री, निलेश देवराम बदादे, पल्लवी श्रीकांत गीते, काशिनाथ शिवराम पाटील, सिंधू हिरामण दुसाने, शिवाजी गोविंद भालके, पंढरीनाथ वामनराव पाटील, राजेश सर्वेश्वर चमोली, स्वाती रोहित भालेराव, जगन्नाथ महादेव गवळी, हेमलता रमेश कामत, रविंद्र अण्णाजी अल्हाट, स्वप्निल रुपचंद्र चौधरी, रमाकांत संभाजी सोनवणे, राजेश सुधाकर अहिरे, अश्विनी अमित गुरव, मनेश मोतीलाल सरकार, मिलन कांती दास, कय्युम शेख, उत्तम निवृत्ती बोराडे, श्वेता नंदकुमार भराडे, लंका मधुकर चहाने, राजू रुपाजी कटारे, शशिकांत जॉन वाघमारे, पुरुषोत्तम विठ्ठल शहाणे, दिनकर लक्ष्मण ढाके या नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी *युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी पगारे (सर), कुणाल पगारे, मंगला चव्हाण, कीर्ती सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
