नाशिक| कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिक कर्तव्य बजावणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने पोलीस मुख्यालयात लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी १६० कुटुंबीयांनी घेतला लाभ आहे. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी जास्तीत जास्त पोलीस कुटुंबीयांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
कोरोना महामारी व संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्वत्र भयंकर परिस्थिती असतांना शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी पोलीस अधिकारी, अमंलदार व पोलीस कुंटुंबियाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली, पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस कल्याण विभाग व डॉ . श्री. प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी , पोलीस रुग्णालय, नाशिक यांनी विशेष परिश्रम घेवून पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे लसीकरणाचा पहिला डोस ९३.६ टक्के व दुसरा डोस ७१.५३ टक्के यशस्वीपणे पूर्ण केला.
आता पुन्हा पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांच्या संकल्पनेतून पोलीस कुंटुंबियाकरीता आजपासुन पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १५ येथे कोविशिल्डचे लसीकरण सुरू करण्यात आले आले. पहिल्याच दिवशी १६० पोलीस कुंटुंबियांनी याचा लाभ घेतलेला आहे. यापुढेही आठवडयातुन दोन वेळा लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. तरी पोलीस कुंटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी पोलीस कुंटुंबियांना केले आहे. सदर लसीकरणाची सुविधा पोलीस मुख्यालयात स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारून केल्यामुळे पोलीस कुंटुंबियांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
या उपक्रमाकरीता नाशिक महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले असून उपलब्ध लसीनुसार यापुढे ही कोविशिल्ड या लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास श्री. दिपक पाण्डेय , मा . पोलीस आयुक्त, नाशिक शहर , श्रीमती पौर्णिमा चौगुले - श्रींगी, पोलीस उपआयुक्त ( मुख्यालय ), श्री. वसंत मोरे सपोआ (प्रशासन ), श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक , पोलीस कल्याण, श्री . डॉ . प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी, पोलीस रुग्णालय, नाशिक व त्यांचा स्टाफ तसेच नाशिक महानगर पालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ.श्रीमती अजिता साळुखे व डॉ . जगताप हे लसीकरण स्टाफसह उपस्थित होते.



