नाशिक| केंद्र सरकारने ज्वेलेरी इंडस्ट्रीच्या शिखर संस्था बरोबर चर्चा न करता हॉलमार्कच्या चार प्रमाणित शिक्क्यामध्ये अचानक बदल करून (H U I D) एचयूआयडी ही किचकट, क्लिष्ट व वेळ खाणारी प्रणाली आणली ही प्रणाली सराफ व्यावसायिकांसाठी अव्यवहरिक असल्याने सरकारच्या या जाचक निर्णयाविरुद्ध देशभरातील सराफ संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता, त्याला नाशिक सराफ सोसिएशनने पाठिंबा दिला होता त्याप्रमाणे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आजचा हा संप शंभर टक्के यशस्वी केला.
त्याचप्रमाणे नाशिक सराफ बाजार येथे व्यावसायिकांनी याचा निषेध नोंदविला याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, उपाध्यक्ष प्रमोद चोकसी, सेक्रेटरी किशोर वडनेरे, खजिनदार योगेश दंडगव्हाळ, नाशिक सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र दिंडोकर , माजी सेक्रेटरी सुनील महालकर पंचवटी सराफ असोसिएशनचे शामराव बिरारी, मयूर शहाणे, मुकुंद शहाणे, लकि नागरे, तुषार विसपुते व सराफ व्यवसायीक उपस्थित होते.
