नाशिकरोड| प्रतिनिधी| प्रभाग १६ येथील रामदास स्वामी नगर, लेन क्र. २, राजमाता जिजाऊ वाचनालय येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी जवळपास १५० नागरिकांनी लस घेतल्याची नोंद करण्यात आली.
लसीकरण केंद्राचे उदघाटन दगडू सोनवणे, रामदास बोरसे, उदय भोगले (सर) या ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा रफिक तडवी, नगरसेवक अनिल ताजनपुरे, नगरसेवक राहुल दिवे, महापालिका पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मूदहलवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगरच्या मागील रहिवासी क्षेत्र असलेले रामदास स्वामी नगर लेन क्र १, २, ३, वैभव सोसायटी, काठे नगर, इंद्रायणी कॉलोनी, प्रेरणा सोसायटी, खोडदे नगर व आसपासच्या परिसरात कोविड-१९ लसीकरण केंद्र असावे यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली होती.
त्यानुसार परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या तर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. आज कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांनी सर्व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले. या केंद्रात तातडीने नोंदणी(ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन), लसीकरण झाल्यानंतर ताबडतोब सर्टिफिकेट यांची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, तथापी येथे कोविड-१९चे सर्व नियम पाळून लसीकरण केले जात होते. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, डॉ भाऊसाहेब बच्छाव, डॉ ऋषभ दायमा, डॉ किशोर भालेराव, डॉ राजेंद्र बागुल, राहुल देवरे, सुनील कदम, अजय केला, जीवन शिंदे, विजय पगारे, नंदकिशोर पगारे, कमलेश जाधव, दिपक सोनवणे, देवेंद्र उफाडे, कैलाश देवरे, दत्तात्रय कोकाटे, संजय गांगुर्डे, प्रकाश राजपूत, जितेंद्र बोरसे, प्रवीण पवार, सुरज दुसाने, पंकज गांगुर्डे, अनिल शिंदे, संजय जोंधळे, निलेश पाटील, विजय अहिरे, कुणाल पगारे, कीर्ती सुर्यवंशी, सुनीता मोकळ, परिचारिका वासंती गावित, जयश्री भोंडवे, सुनीता गायकवाड आदी उपस्थित होते. लसीकरण झालेल्या नागरिकांना अल्पोपहार, चहा देण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व्याधीग्रस्तांना दिलासा
लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी नागरिकांनी सतत मागणी केल्याने पाठपुरावा केला. याकामी सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले. याभागात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्याधिग्रतांना दिलासा मिळेल. लसीकरण केल्यानंतर ताबडतोब सर्टिफिकेटची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
सौ.सुषमा रवि पगारे,
नगरसेविका प्रभाग १६

