दिल्ली| टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने तब्बल १२ वर्षानंतर दुसरे गोल्ड मेडल मिळविले आहे. यापूर्वी अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पकमध्ये पहिले गोल्ड मिळवले होते. नीरजच्या या कामगिरीमुळे भारताची मान उंचावली असून इतर खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. निरजला गोल्ड मेडल मिळाल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून नीरज चोप्राची दमदार कामगिरी बघून सर्व भारतीयांना त्याच्यावर विश्वास होता. प्रत्येक सामन्यागणीक त्याची कामगिरी उंचावत असल्याने त्याच्यावर सर्व भारतीयांची नजर होती आणि त्याने सर्वांच्या अपेक्षांवर खरं उतरत भारताला भालाफेक मध्ये गोल्ड मेडल मिळवत तब्बल १२ वर्षानंतर दुसरे गोल्ड मिळवून देत भारताची मान उंचावली. २००८ आली अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.
भारताला गोल्ड मिळून द्यायचा नीरजचा इरादा पक्का दिसत होता. जेव्हा नीरज अंतिम फेरीत भाला फेकण्यासाठी धावत होता, तेव्हा असे वाटले की हा तरुण ऑलिम्पिकमध्ये काही तरी करून दाखवेल. सहा फेऱ्यापर्यंत देशवासीयांनी श्वास रोखून धरला होता, कारण इतर स्पर्धक तेवढ्याच जिद्दीने खेळत होते. दुसऱ्या फेरीत नीरजने असा भाला फेकला ज्याचे अंतर इतर कोणताही खेळाडू पार करणे शक्य झाले नाही. नीरजने दुसऱ्या फेरीत ८७.५८ मीटर फेकले आणि विरोधकांसाठी जे लक्ष्य ठेवले ते अभेद्य बनले आणि आधारे या आधारे गोल्ड मेडलवर नाव कोरले.
