नाशिकरोड|प्रतिनिधी|ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनतर्फे (नाशिक विभाग) कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य ट्रक भरून कोकण प्रांताकडे रवाना करण्यात आले. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे या लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वज दाखवून ट्रक रवाना करण्यात आला.
याप्रसंगी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, नगरसेविका सौ संगिता गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मल्याळी असोसिएशनचे (नाशिक विभाग) कार्य कौतुकास्पद असून या असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही असोसिएशनने भरपुर मदत केली आहे. पूरग्रस्त कोकण भागात अनेक लोकं उघड्यावर आहेत. त्यांना मल्याळी असोसिएशनने मदतीचा हात पुढे करून बांधिलकी जपली. त्यांच्या कार्याला सर्व लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा, असे गौरवोद्गार नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी काढले. मल्याळी असोसिएशनचे प्रेसिडेंट रणजित नायर यांनी सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), असोसिएशनचे चेयरमेन कोरुथ कोशी, शिबू जोस, एलिझाबेथ सत्यन, मोहन पवार, नीतू रत्नाम, प्रसन्ना रत्नाम, डिनो डारली आदी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
असोसिएशनचे काम कौतुकास्पद: पगारे
ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपून कोकणात मदत पाठवली. मल्याळी असोसिएशन (नाशिक विभाग)चे कार्य कौतुकास्पद आहे.
सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका, प्रभाग क्र. १६
१३ वर्षापासून नियमित मदत कार्य: नायर
मागील १३ वर्षांपासून मल्याळी असोसिएशन नाशिक विभागाचे कार्य नियमित सुरू असून नैसर्गिक आपत्तीत गरजूंना मदत करणे, हे आमचे दायित्व आहे. मल्याळी असोसिएशन ही समाजाच्या भल्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे.
रणजित नायर, प्रेसिडेंट,
ऑल इंडिया मल्याळी असोसिएशन (नाशिक विभाग).
-----
