मोखाडा| मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथे राहणाऱ्या लोकांना ईश्वर चंदर जाधव यांना जिजाऊ संस्थेने घर उभारणीसाठी पत्रे व इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन मदत केली आहे.मुसळधार पावसामुळे ईश्वर जाधव यांचे घर पडले होते ही माहीती माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांना समजताच त्यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पत्रे व इतर साहित्याची मदत केली आहे.
नाशिक। प्रतिनिधी: ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची नावे सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे. अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...
