दिल्ली| भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज 50 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण केला, या मैलाच्या टप्प्यानंतर, पुढेही आपण लसीकरणाची गती अशीच कायम ठेवू आणि ‘सर्वांना लस-सर्वांना मोफत लस’ मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करु, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "भारताच्या कोविडविरुद्धच्या लढाईला आज मोठे बळ मिळाले आहे. लसीकरणाच्या आकडेवारीने 50 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. आता याच भक्कम पायावर, आपण लसीकरणाची संख्या अधिकाधिक वाढवत नेऊ आणि ‘सर्वांना लस, मोफत लस” मोहिमेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू, अशी आशा आहे.”
*देशात आतापर्यंत एकूण 3,10,55,861 रुग्ण बरे झाले आहेत.
*रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.37%
*गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण बरे झाले
*भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद
*भारतात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153
*एकूण रुग्णसंखेच्या तुलनतेत सक्रीय रुग्ण 1.29% आहेत.
*साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% खाली कायम असून, सध्या तो 2.39%
*दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.21%; गेल्या 12 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
*चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ– एकूण 47.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या
