मोखाडा| कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मधील 1996 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करत गरीब मित्राला वीस हजाराची मदत केली. एक वर्षापूर्वी 1996 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुप स्थापन करत विचारांची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र काही दिवसांपूर्वी एका गरीब मित्राला मदत करण्यासाठी एक हजार रुपये प्रत्येकी देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत वीस हजार रुपयाची मदत जमा झाली.
त्यातून दहा हजार रुपयांचा किराणा व दहा हजार रुपये रोख अशी मदत करण्यात आली आहे. ही मदत देण्यासाठी मित्र एकत्र जमत त्याच्या घरी गेल्याने त्या मित्राला प्रचंड आनंद झाला व हर्षोल्लसित झालेल्या गरीब मित्राने आनंद व्यक्त करत सर्वांचे स्वागतही केले. व्हाट्सअप ग्रुपचा असाही सकारात्मक उपयोग होऊ शकतो हे आपणाला या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
