मोखाडा| भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील समंस्याबाबत निवेदन दिले आहे.मोखाडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन अत्यंत दऱ्याखोऱ्यात विखुरलेला तालुका आहे, येथील आरोग्याच्या समस्यां नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे, याकडे चोथे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात खालील मागण्या केलेल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय मोखाडा करीता शववाहीनी उपलब्ध व्हावी, रुग्णांसाठी ५० कोटीची अतिरीक्त व्यवस्था उपलब्ध व्हावी.सोनोग्राफी करण्याची व्यवस्था आठवड्यातून निदान दोन वेळा तरी व्हावी.भूलतज्ज्ञाची नेमणूक करण्यात यावी.जेणेकरून येथेच सिझेरियन करून प्रसुती करता येईल.रूग्ण व रूग्णा़सोबत आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी रूग्णालय परीसरात बाकडे व त्यावर शेडची व्यवस्था व्हावी.स्तनदा मातांसाठी सुविधायुक्त हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा.रुग्णालयात शुध्द पाणी पिण्यासाठी आरो सुविधा उपलब्ध व्हावी.
