डोळ्यांच्या पापणी सवे तू...
सोबत आहेस पण दिसत नाहीस तू...
उघडताच डोळे अदृश्य होतेस तू...
बंद करताच डोळे हरावतेस तू...
माझ्या विचारांचा समुद्र तू...
मध्ये असलो तर भिजवतेस तू...
किनाऱ्यावर सुखाचा स्पर्श देऊन जातेस तू...
हृदयाच्या ठोक्या प्रमाणे तू...
शांत असलो तर ठोके वाढवतेस तू..
उसळलेलं असेल तर त्यांना थांबवतेस तू...
धागा मी त्यातले मणी तू...
कुंकू मी त्यातला रंग तू...
शरीर मी त्यातले प्राण तू...
तुझ्यात मी आणि माझ्यात तू...
रचना: राहुल बर्वे,
मुंबई
