Skip to main content

गोदाकाठ पाहणी दौरा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा: ना. भुजबळ

नाशिक| गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झाला असून, काल रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलनाचे काम सुरू असून, शासन-प्रशासनाला मनुष्यासह सर्व जिवीतांची काळजी असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीही  प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आज राज्याचे अन्न नागरी पुरवठव व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Godavari-Pavsamule-Nukasaniche-immediate-panchaname-kara-minister-Bhujbal
आज 28,29 सप्टेबर या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची नाशिक शहरातील मालेगाव स्टॅण्ड पंचवटी परिसरात पाहणी करतांना पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर येण्याचे प्रसंग वेळोवेळी उदभवतात. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व जलसंपदा विभाग आपआपल्या आदर्श कृती आराखड्याप्रमाणे काम करत असतात. काल रात्रीपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टी व परिस्थितीचा आढावा वेळोवेळी यंत्रणांच्या संपर्कातून घेतला जात असून, जिल्ह्यात कुठेही मनुष्यहानी झाल्याची माहिती दिसून येत नाही. काही भागात दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र काही ठिकाणी चार ते पाच जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, लासलगाव येथे हॉस्पिटल्समध्ये पाणी शिरून डॉक्टर्स, पेशंटस व परिचारिका अडकून पडले होते. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्यासाठी माहिती संकलनाचे काम संबंधित यंत्रणांमार्फत सुरू असून अतिवृष्टी आणि त्यामुळे रस्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे यंत्रणा हळूहळू पोहचते आहे. अशाही परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.
गोदावरी नदीला असलेली महापुराची पार्श्वभूमी पाहता नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्व:ताची काळजी घ्यावी. पाऊस अजून संपलेला नाही, धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार हळूहळू सुरू आहे. मनपा, महसुल, पोलीस व जलसंपदा विभागसह जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...