कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांना ही काही अटींवर शासनाने परवानगी द्यावी: हभप कापसे महाराज यांची मागणी
नाशिक| प्रतिनिधी| राज्यातील धार्मीक कार्यक्रम . किर्तन, प्रवचन व भजन सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगसचे नाशिक तालुका कार्याध्यक्ष ह.भ.प. श्री. निवृत्ती कापसे महाराज यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात कापसे महाराज यांनी म्हटले आहे की, राज्यात ७ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . घेतलेला निर्णय योग्य आहे .परंतु आपण धार्मिक कार्यक्रम किर्तन, प्रवचन यावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. या कार्यक्रमामुळे लोकांवर चांगले संस्कार होतात, अशा जनजागृतीतून लोकांना व्यसनापासून परावृत्त करता येते.
अजाराच्या काळात लोकांचे मानसीक संतूलन स्थीर राहाण्यास मदत होते. त्यामुळे काही निर्बंध शिथिल करून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दयावी अशी मागणी करण्यात आली आहे. निर्बध घातल्यामुळे वारकरी मंडळी नाराज आहे . म्हणून आपण काही नियम घालून देऊन या कार्यक्रमांना निर्बंधातून शिथिलता दयावी अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे.


