औरंगाबाद |प्रतिनिधी| निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबादच्या वतीने, स्मृतीशेष नामदेव सांडूजी साळवे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त, कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १३ऑक्टोबर २०२१ रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,टी. व्ही सेंटर हडको औरंगाबाद येथे मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात नागरिक रस्त्यावर येण्यासाठी देखील घाबरत असत.अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची,आणि आपल्या परिवाराची पर्वा न करता अनेकजण कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाची सेवा करत आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यात अनेक कोरोना योद्ध्याचा कोरोनाने बळी घेतला. याची निळे प्रतीकने गंभीर दखल घेतली आहे. लॉकडाऊन काळात देखील निळे प्रतीकच्या वतीने अनेक गरजूना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते.
कोरोना काळात ज्यांनी आपलं योगदान दिलं, माणुसकी जपुन आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या कोविड योद्धा्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कोविड रुग्णालयात ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. त्यांनी रग्णालयात काम केल्याचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, एक पासपोर्ट फोटोसह संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अर्ज करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रतकुमार साळवे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
आयु. रतनकुमार साळवे,
अध्यक्ष निळे प्रतीक बहुद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद:- 9923502320

