नाशिक| प्रतिनिधी| प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून होणारे गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करुन देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे.
देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत पाच दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती स्विकारतांना ते बोलत होते. विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे.
पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश मुर्ती देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्वीकारण्यात आल्या आहेत. याआधी दिड दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती देखील संकलित करण्यात आल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे कार्यकर्ते मुर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व विविध सौंदर्यप्रसाधनांची मुतीचे गोदावरी नदीत विसर्जन केल्याने प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य मिळत आहे.
यावेळी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, कोमल कुरकुरे, सोनू जाधव, हृषिकेश आहेर, युवराज कुरकुरे, हर्षल देवरे, ऐश्वर्या अलोणे, अक्षय इंगळे, तन्वी हुंडेकर, सौरभ हेलोडे, प्रशांत मते, अनुश्री बागुल, सुनील गायकवाड, स्नेहा साखरे, सुयश शिंदे, साक्षी निकम, सुशीलकुमार शिंदे, दीक्षा पाटील, तन्वी मथुरे, युगंधर आठवले, भाग्यश्री पाटील, चैतन्य ढेंगळे, वैभव सांगळे, विकास फडत, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी:- अकराव्या वर्षाच्या देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत पाच दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती आकाश पगार यांच्याकडे गणेश सुपुर्द करतांना गणेशभक्त. यावेळी विशाल गांगुर्डे, कोमल कुरकुरे, ऋषिकेश आहेर, सोनू जाधव, हर्षल देवरे, अक्षय इंगळे आदी दिसत आहेत.
