Skip to main content

केवळ महाराष्ट्रच नाही, मध्य भारताच्या सीमेलगतच्या राज्यांमधील रुग्णांना परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील: नितीन गडकरी

नवी दिल्ली|केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत एम्स, नागपूरच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डिजिटल कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे आणि राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री (नागपूर) डॉ.नितीन राऊत हे   देखील उपस्थित होते.
Patients-not-only-in-Maharashtra-but-also-in-bordering-states-of-Central-India-will-get-affordable-and-modern-medical-facilities-Nitin-Gadkari
संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करताना  गडकरी म्हणाले, “विदर्भ प्रांताच्या गरजा लक्षात घेऊन, नागपूर येथे एम्स, नागपूर सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या स्थापनेमुळे  मध्य भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमधील रुग्णांना  परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील. मात्र आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की या सुविधांचा लाभ केवळ शहरांपर्यंतच नाही तर आपल्या भागातील दुर्गम गावांमधल्या  लोकांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे. ”
अलीकडेच बांधण्यात आलेल्या एम्स संस्था दीर्घकालीन प्रादेशिक असंतुलन दूर करण्याच्या उद्देशाने बांधल्या आहेत हे अधोरेखित करत ते म्हणाले की, सध्याच्या एम्स संस्थांची संख्या दुप्पट केल्यास भारताच्या आकांक्षा  अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील.....सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील वंचित क्षेत्रांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे याबद्दल डॉ. पवार यांनी आनंद व्यक्त केला. " आपणा सर्वांना माहित आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  इतक्या दशकांनंतरही देशात फक्त 6 एम्स स्थापन झाल्या .  त्यानंतर वर्ष 2014 मध्ये, सरकारने पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात एम्स विकसित करण्याचे धोरण विकसित केले.

एम्स नागपूरने शैक्षणिक आणि रुग्ण सेवांमध्ये सकारात्मक प्रभाव पाडल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, “या संस्थेने 2020 मध्ये पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम सुरु केला हे उल्लेखनीय आहे. मला सांगण्यात आले आहे की संस्थेने पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे विविध स्वरूपातले अभ्यासक्रम  विकसित केले आहेत, जे राष्ट्रीय महत्त्व असलेल्या या संस्थेतील उच्च दर्जाचे मापदंड  दर्शवतात. ”

भारताच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोविडप्रति  मिळालेल्या भक्कम सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाबद्दल बोलताना त्यांनी  उपस्थितांना आठवण करून दिली की, कोविड महामारी  काळात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  संस्थेच्या गरजा लक्षात घेऊन प्राधान्याने व्हेंटिलेटर, हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई, किटची उपलब्धता, मास्क आणि जीवरक्षक औषधांची उपलब्धता सुनिश्चित केली. कोविड महामारीच्या  दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांना कोविड डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

डॉक्टर म्हणून आपल्या समृद्ध अनुभवातून बोलताना त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी आणि समुदायाला सल्ला देताना सांगितले  की वैद्यकीय उपचाराबरोबरच, रूग्णांसाठी सहानुभूती आणि भावनिक काळजी देखील तितकीच  महत्त्वाची आहे.  “ आरोग्य सेवा प्रदात्याची आणि काळजी घेणाऱ्या टीमच्या प्रत्येक सदस्याची ही मुख्य जबाबदारी आहे . रुग्ण त्यांचा बहुतांश वेळ  परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट यांच्याशी संवाद साधण्यात घालवतात. हे संवाद रुग्णांप्रती करुणा आणि सहानुभूती दाखवण्याच्या अनेक संधी देतात.  म्हणूनच, रुग्णाची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिल्यास रुग्णांवर  सकारात्मक  परिणाम होईल. ”

त्यांनी  गरीबांच्या उपचाराचा खर्च कमी करणे आणि डॉक्टरांची संख्या वाढवण्याबरोबरच आधुनिक उपचार सुविधांना प्राधान्य देणाऱ्या प्रतिबंधात्मक सेवांवर  भर दिला आणि  केंद्र सरकारच्या  प्रयत्नांची रूपरेषा स्पष्ट केली.  एम्स नागपूर समुदायाचे एकत्र काम करण्याचे त्यांनी स्वागत केले जेणेकरून देशाचे विकास कार्य समर्पण आणि चिकाटीने पुढे नेता येईल....केंद्र सरकारच्या विविध आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "अनेक आव्हाने येतील, मात्र  मला खात्री आहे की, तुम्ही हे सर्व अडथळे पार कराल, अधिक उंची गाठाल आणि राज्यातील इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्श बनाल . असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी संस्थेच्या  "अभिज्ञानम" मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...