नाशिक| सोशल मिडीयावर पोस्ट टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाच्या तुषार भोसले यांच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हयात त्याचे पडसाद उमटले आहे. भोसले विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे, असे रायुकाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले असता ते पळून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर गुन्हा दाखल न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्ह्यातील नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलीय, यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, विधानसभा अध्यक्ष तुषार खांडबहाले, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकर, तालुका कार्याध्यक्ष आकाश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष राज पगार,या.सरपंच दौलत निंबेकर.ऊमेश शिंदे,आदी उपस्थित होते. चांदवड, मालेगाव, आडगाव याठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे.
शक्तीस्थळांबाबत अपशब्द सहन करणार नाही: कडलग
आमच्या शक्तीस्थळांबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक उल्लेख करत असतील तर निश्चित त्याला ईथुन पुढे चांगलाच धडा शिकवू जेणे करुन भविष्यात कोणीही वैयक्तीक टिका करणार नाही. जिल्ह्याती ज्या-ज्या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे त्या त्या ठिकाणी भोसलेला हजर करून अटक करावी अशी विनंती पोलीस निरीक्षक यांना करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम कडलग
जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस
नाशिक