नाशिकरोड| प्रतिनिधी| नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर बससेवा तपोवन-टाकळीमार्गे सुरू झाल्याने प्रभाग १६ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग १६ मधील ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधींच्या हस्ते बसची पुजा करण्यात येऊन झेंडा दाखवून टाकळीमार्गे बससेवेला प्रारंभ झाला.
प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांनी आगरटाकळी ते रामदास स्वामी नगर थांब्यापर्यंत प्रवाशांसमवेत बस मध्ये प्रवास केला. याप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते बस मधील चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. मागील दिड वर्षांपासून कोविड १९ मुळे टाकळीमार्गे बससेवेला खंड पडला होता. बससेवा सुरू होण्यासाठी परिसरारातील लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केल्याने सर्व नागरिकांच्यावतीने नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी युगांतर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), रफिक तडवी, अनिल जोंधळे, सुनील जोंधळे, जयेश सोनवणे, यशवंत साळवे, अलका निकाळे, मीरा मोरे, मीना पगारे, कविता पगारे, राजू जाधव, अजय केला, नंदू पगारे, प्रमोद गोसावी, राजू धनगर, सुनील साळवे, प्रशांत रावळ, भारत लोखंडे, अतुल औटे, अनिल पगारे, शिवाजी सूर्यवंशी, सुखदेव मेसमाळे, पप्पू पवार, विजय साळवे, कैलाश देवरे, गौरव केदारे आदी प्रभागातील नागरिक, महिला तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळीमार्गे बसथांब्यासाठी विविध ठिकाणी स्टॉप, वेळापत्रक लवकरच येथे बसवण्यात येईल.
असा असेल मार्ग
---------------------------
पंचवटी निमाणी-तपोवन-टाकळी फाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड तसेच सी बी एस-द्वारका-टाकळीफाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड.
नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा
कोविड - १९ मुळे बससेवेला खंड पडला होता. परिणामी येथील नागरिकांना फारच गैरसोय सहन करावी लागली. परंतु महापालिकेने आता ही अडचण सोडवली असून बससेवेला प्रारंभ झाला. शाळा-महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथील शाळकरी मुले-मुली, महाविद्यालयीन युवकांना या बससेवेचा लाभ होईल. नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.
सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका, प्रभाग क्र १६.