नाशिक| राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसतर्फे शहर संघटकपदी सौ. मंदा काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब. मा.ना.श्री. अजितदादा पवार, मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ, मा.खा.सौ. सुप्रियाताई सुळे व महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकणकर यांना अभिप्रेत असणारी महिला संघटना बांधण्यासाठी व पक्ष वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा व्यक्त करून पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास आहे, असे सौ. अनिता महेश भामरे यांनी म्हटले आहे.