Skip to main content

गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात

नाशिक| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नासिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी उत्सव १५ ते २१ डिसेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. या उत्सवाची सुरूवात बुधवारी सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून झाली. यावेळी पूजा निलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. 
Godavari-festival-begins-with-Inheritance-round

गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सौ. मयुरा मांढरे,  पोलिस आयुक्त दिपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासारपाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलिस निरिक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते. 

सकाळी साडेसात वाजता सुलेखनकार पुजा निलेश यांनी नदी सूक्त हा विषय घेत. सुलेखन केला नमुना सादर केला. त्यांनी केलेल्या सुलेखनाची माहीत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी घेतली. त्यांच्या सुलेखनातून साकारलेल्या विविध नद्यांची नावे यावेळी त्यांनी मांडली. यानंतर प्रा. सुरेखा बोर्हाडे यांनी यावेळी गोदावरी नदी याविषयी एकपात्री नाटक सादर करील उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी या विषयावर साकारलेली दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी भेट दिली. नाशिककरांनी या चित्र प्रदर्शनाचे कौतुक केले. 

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चित्रकार रमेश जाधव यांच्या चित्रांचे कौतुक करीत त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर काढलेल्या चित्रांचे पुस्तक जिल्हाप्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी श्री. मांढरे म्हणाले,‘गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नासिकची मोलाची संपत्ती आहे. ती जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. हा वारसा जपत आपल्याला विकास साधायला आहे.’यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी वारसाफेरीनिमित्त आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. गोदावरी विषयी असलेल्या विशेष प्रेमामुळे नासिकशी आपले नाते घट्ट झाले आहे. गोदावरी नदी बद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केले. 

सकाळी आठ वाजता वारसाफेरीला सुरूवात झाली. यावेळी कुंडांचे अभ्यासक देवांग जानी यांनी गोदाकाठावरील कुंड आणि त्यांचा इतिहास यावेळी सांगितला. गोदावरी काठावरील कुंडांची माहिती देताना त्यांनी नकाशाच्य माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी जानी म्हणाले, ‘गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदी पात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू शकतो. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का याचा अभ्यास व्हायला हवा.  

तर नासिकचे अभ्यासक रमेश पडवळ अश्मयुगीन इतिहास, नदीचे महत्त्व, नदी संस्कृत आणि नदीभवतीची वारसास्थळांची माहिती दिली. पडवळ म्हणाले,‘आपली संस्कृती समजून घेण्यासाठी नासिक शहराचा इतिहास समजून घेणे खूप गरजेचे आहे. अश्मयुगापासून नासिकच्या गोदाकाठावर लोकसंस्कृती नांदते आहे. ही संस्कृती निर्माण होण्यासाठी गोदावरी नदी पोषक ठरते आहे. आजही नासिककर गोदावरीशिवाय राहू शकत नाही. गोदाकाठची मंदिरे, वाडे, गढ्या आणि समाधी ही नासिकची ओळख आहेत. हे विसरायला नकोत.    

गजानन महाराज गुप्ते मंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर वारसाफेरीला सुरूवात झाली. सकाळी ८.३० ते १०.३० या दोन तास चाललेल्या वारसाफेरीत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सहभागी झाले होते. देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारूती, अहिल्याराम मंदिर, कुष्ण मंदिर व नारोशंकर मंदिर अशी वारसाफेरी पार पडली. यादरम्यान नासिकचा इतिहास व शक्ती, भक्तीस्थळांची माहिती करून देण्यात आली. 

अधिक माहितीसाठी संपर्क : महेश शिरसाट : 99703 59934
००००००००००००००००००
१६ ते २१ डिसेंबर : नदी महोत्सव व्याख्यानमाला 

गुरुवार, १६ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान: नदी संस्कृती : डॉ. प्राजक्ता बस्ते, नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : गोदाघाटावरचे नाशिक : चेतन राजापूरकर.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शनिवार, १८ डिसेंबर २०२१
सकाळी : ७.०० वाजता : गोदाकाठचे पक्षी जीवन :  संयोजन व मार्गदर्शन : प्रा. आनंद बोरा
ठिकाण : गाडगे महाराज धर्मशाळा, गोदाघाट
सायं : ५.३० ते ७.०० : व्याख्यान : जल प्रदूषण :  डॉ. व्ही. बी. गायकवाड 
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

रविवार, १९ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : प्राचीन नाण्यांमधील नदी : डॉ. कैलास कमोद 
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

सोमवार, २० डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : नासिकची गोदावरी : डॉ. शिल्पा डहाके, गोदावरी अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

मंगळवार, २१ डिसेंबर २०२१, ५.३० ते ७.००
व्याख्यान : ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम : प्रा. डॉ. प्रमोद हिरे.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक 
--------
अधिक माहितीसाठी संपर्क : महेश शिरसाट : 99703 59934

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...