Skip to main content

'सराफ बाजार' नाशिकचा अलंकर

नासिक हे हजारो वर्षांची पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले नगर आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर प्रगतीत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे तर देशातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्येही अव्वल स्थानावर आहे. नासिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही प्राचीन आहे. अन्य व्यवसायांबरोबरच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय येथे शतकानुशतके चालू असून पेशवाईत नासिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने इ.स.१७२५ नंतर नासिकची भरभराट झाली. याच काळात सराफी व्यवसायही जोमाने वाढला. परंपरागत सोने दागिण्याबरोबर चांदीच्या भांडीमाल व इतर वस्तुंचे उत्पादनही येथे होऊ लागले. हळूहळू नासिक हे शुद्ध चांदीची बाजारपेठे म्हणून देशभर प्रख्यात झाले आणि नावारूपाला आले. आजमितीला नासिक महानगरपालिका क्षेत्रात लहान मोठी हजाराच्यावर सराफी दुकाने आहेत. सराफ व सुवर्णकारांचे उत्तम सहचर्य हे नासिकच्या सराफ बाजाराचे वैशिष्ट्य आहे. नासिकमधील सर्व स्थानिक सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे केंद्र म्हणजे नासिकचा जुना सराफ बाजार होय. बदलत्या युगातही भविष्यकाळातील बदलत्या गरजा ओळखून सुवर्ण व्यावसायिक भावी आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज आहेत.
Saraf-Bazaar-nashikcha-alankar-old-bazaar-nashik

पिढ्यांपिढ्या टोचले जातात विश्वासाने कान

नाशिकच्या सोन्यासारख्या पारंपरिक व्यवसायाला देखील आता तीनशे वर्ष झाली आहेत. विशेष, म्हणजे गेल्यातीनेशे वर्षांपासून नाशिक सराफ बाजाराने नाशिकरांचा विश्वास कायम ठेवला आहे हे आजच्या वाढलेल्या गर्दी आणि उलाढालीवरून पहायला मिळतं. प्रत्येक व्यवसायाला ब्रॅण्डिंगची गरजपडते मात्र, नाशिकचा सराफ बाजार स्वत:च एक ब्रँड ठरला असून, याच जोरावर नाशिककरांचा विश्वास अधिकच दृढ झाल्याचे दिसते आहे. म्हणूनच सराफ बाजाराने सोने व्यवसाय नव्हे; तर पिढीजात सेवा ही परंपरा कायम राखली आहे. म्हणूनच नाशिककरांनीही पिढ्यांपिढ्या सराफ बाजारातून सोने खरेदीची परंपरा कायम राखली आहे. एवढेच नव्हे; तर अगदी कुटुंबातील प्रत्येकाने याच सराफ बाजारात कान टोचले आहेत. मुंज असो अथवा लग्न सोहळा, दिवाळी असो पाडवा घरात सोनं आणण्यासाठी नासिकच्या सराफांकडेच सोनं खरेदी करण्याचा आपला शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यामुळेच ग्राहक-व्यापारी हे संबंध येथे दृढ झालेले दिसतात. त्यामुळे पेढीपासून अगदी मॉलपर्यंत या व्यवसायाने मजल मारली आहे. मौल्यवान सोन्याबरोबर खरेदीचे समाधान देण्यासाठी अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित सराफबाजार हे नाशिकसराफ असोसिएशनचे ध्येय आहे.
 
 
लखलख चांदीला नासिकची झळाळी

धार्मिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी लाभलेलं हे नाशिक शहर जसं आल्हाददायक हवेसाठी, द्राक्षांसाठी, वाइनसाठी प्रसिद्ध आहे, तसंच त्याला चांदीचं वलयदेखील लाभलं आहे. चांदीची भांडी बनवणारी अनेक शहरं देशात आहेत; पण चोख टंचाची(वस्तूतील चांदीचं प्रमाण) भांडी म्हटलंकी हमखास नाव समोर येतं ते नाशिकचं. नाशिकच्या चांदीचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीची भांडी घडविताना मिळणारी धातूची शंभर टक्के शुद्धता. त्यामुळेच नासिकच्या चांदीने स्वत:चं असे वेगळं स्थान निर्माण केलं आहे.केवळ ताट-वाटी, तांब्या, पूर्जअर्चेतील भांडी इतकेच नाही तर कलाकुसरीच्या आणि हस्तकलेतही किमया दाखविली आहे. नाशिक घाटाची भांड्यांची व उपकरणांची घडणावळ, त्यावरील नक्षीकाम हे नाशिकचे वेगळेपण नाहीतर या वेगळेपणाला जगभरात ओळख मिळाली आहे. शुद्ध चांदीची भांडी आणि मूर्ती हे नाशिकच्या कारागिरांचे वैशिष्ट्य. या भांड्यांना आणि मूर्तींना देशभरातून मागणी असल्याने दरवर्षी नासिकमध्ये चांदीची सुमारे पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होते. नासिकच्या चांदीच्या बाजारपेठेत होणार आणखीन एक मोठं उत्पादन म्हणजे ओतीव काम करून तयार केलेल्या देव-देवतांच्या भरीव मूर्ती. नाशिकच्या कारागिरांनी संत श्री निवृत्तिनाथांचा संपूर्ण चांदीत घडविलेला २३० किलोंचारथ नऊशे माणसांनी अविरत काम करून बनविला. तसेच, पंढरपूरमधील उत्सवमूर्ती, सप्तशृंगी देवीचा गाभारा, नासिकच्या कालिका मंदिराचा गाभारा नाशिकच्याच कारागिरांनी घडविला. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.त्यामुळे शुद्ध चांदीच्या वस्तू म्हटल्यावर आपसूकच सर्वाच्या तोंडी नासिकचं नाव आल्याशिवाय राहत नाही.
                                                                        
धर्मकाटा एक सेवाधर्म

नासिक सराफ बाजारातील धर्मकाटा स्थापना १८९२ मध्ये झाली. २३ डिसेंबर रोजी ८४ वर्ष पूर्ण होऊन ८५ व्या वर्षात धर्मकाटा पदार्पण करीत आहे. ग्राहकांसाठी असलेला हा एकमेव असा धर्मकाटा आहे की सराफ असोसिएशनतर्फे चालविला जातो. साधारणता १८९२ साली परचुरे यांचा धर्मकाटा या ठिकाणी होता. कालांतराने हा नासिक सराफ असोसिएशन घेऊन २३ डिसेंबर १९३५ रोजी धर्मकाटा या नावाने सुरू केला. तेव्हापासून धर्मकाटा ही संकल्पना सराफ असोसिएशनतर्फे एक सेवाधर्म म्हणून राबविली जात आहे. विक्रेता व्यवसाय आणि सेवा यातील हा एक अनोखा मिलाप धर्मकाटा साधतो आहे.धर्मकाटा हा सराफ बाजारातील व्यवहारावर विश्वार्यता निर्माण करतान दिसतो. त्यामुळेच धर्मकाट्याला सेवाधर्म म्हटले गेले आहे. मौर्य काळातील चाणक्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात सर्वप्रथम धर्मकाट्याचा उल्लेख आढळतो.चाणक्याने वर्णल्याप्रमाणे, विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात एक त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून व्यवहाराची अथवा त्या मालाची पडताळणी करावी. या चाणक्य सूत्रासाठीच प्राचीन काळातही धर्मकाटा ही संकल्पना राबविली जात असावी, असे दिसते. त्यामुळे  आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व्यवहार अधिक विश्वासाने होत राहण्यासाठी सराफ बाजारातील धर्मकाटा हा महत्त्वाचा दुवा ठरतो आहे.यामुळे आतापर्यंत सराफ बाजारातील विश्वार्सता टिकून आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे पारदर्शक व्यवहाराची खात्री देणारा धर्मकाटा नाशिक सराफ बाजाराची शान ठरतो आहे.
८५ वर्षांपासून आजही आपला धर्मकाटा ग्राहकांच्या सेवेसाठी रोज सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत अविरत सुरू आहे. या सेवेचा लाभ सराफ बाजारात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनी व विक्रेत्यांनी घ्यायला हवा.

नाशिकची बदलती दागिना संस्कृती

नासिक पूर्वी पासूनच शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे नासिक विभागात आजही ग्रामीण भागात अथवा शहरी भागात गाठले, खान्देश वेढची नथ वैगरे शुद्ध सोन्याचे दागिने  आपल्या नासिकची ओळख तर  नासिक घाटाची शुद्ध चांदीची भांडी हा आपला वारसा गेल्या शेकडो वर्षा पासून आपल्या नासीकचा सराफांनी जपलेला आहे.नवीन पिढीचे दागिनेही आपल्या सराफ बाजारात उपलब्द आहेत नवीन अत्याधुनिक दागिने यात रोज गोल्ड, पिंक गोल्ड,cz ज्वेलरी, रोडियम पॉलिश ज्वेलरी याच बरोबर युवा वर्गाला खास आकर्षण असलेले प्लॅटिनम दागिने देखील नासिक मध्ये उपलब्द काही व्यावसायिकांनी ई-शॉपी देखील सुरू केलेला आहे .सोशल मीडियाचा वापरही सराफ व्यवसायात जाहिरात व प्रोमोशन साठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सराफ बाजार काळानुरूप बदललेला जरा असला तरी शुद्ध सोन्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.

चेतन राजापूरकर,
माजी अध्यक्ष, नासिक सराफ असोसिएशन

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...