नाशिक| आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी विभागाची बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार विभागवार अध्यक्षांच्या नेमणूका देखील करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागाची बैठक पार पडली.
यावेळी मोतीराम पिंगळे, सुरेश आव्हाड, सुरेखा निमसे, संतोष जगताप, निलेश जगताप, सरिता पगारे, चिन्मय गाढे, सागर लहामखेडे, किरण पानकर, गणेश पेलमहाले,महेश शेळके, विजय पेलमहाले, रामेश्वर साबळे,आर्यन मोकळ, वैभव अभंग, गणेश सदाफुले, बजरंग गोडसे, सागर अभंग, निलेश जगताप, साहिल मोकळ, सचिन काळसरे, हिमांशू चव्हाण, विलास वाघ, रुपाली खैरे, प्रफुल्ल पाटील, वनिता आहेर, मीनाक्षी काकळीज, स्वप्नील निकम, अरविंद सोनवणे, विशाल वाघ, विकास इंगळे, आकाश कोकाटे, संध्या निकाळे, संगीता घाडगे यांच्यासह सर्व सेलचे विभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक लढविण्यात येणार असून या निवडणुकीत जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षातील ज्येष्ठ नेते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बाळासाहेब कर्डक म्हणाले की, राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, ध्येय धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळं, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपले मते मांडली.