नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने इगतपुरी तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली.
इगतपुरी तालुक्यात लायसन नुतनीकरनाचा प्रश्न 2019 पासुन प्रलंबित असल्याने व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यन्तचे पैसे देण्यात यावे व लायसन नूतनीकरण करून देण्यात यावे असे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख श्री गणपतराव डोळसे पाटील, निवृत्ती कापसे, दिलीप नवले, गोपी मोरे हे संघटनेच्या वतीने उपस्थित होते इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उभाळे, उपाध्यक्ष अरुण बागडे ,संजय गोवर्धने, प्रकाश नाठे, देवरामशेठ मराठे, रघुनाथ तोकडे हे प्रमुख दुकानदार उपस्थित होते.