नाशिक| नाशिक मूव्हीमॅक्सच्या माध्यमातून प्रादेशिक मनोरंजनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चित्रपट प्रदर्शनासह विविध प्रादेशिक उपक्रमांवर भर देऊन विस्तार करण्याचा सिनेलाईन उद्योग समूहाचा मानस आहे.
नाशिक येथील मूव्हीमॅक्स सिनेमागृहांमध्ये स्थानिक सामग्रीच्या प्रवाहाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. भारतात ११ मे २०२२ ला चित्रपट प्रदर्शन व्यवसायात पुन्हा प्रवेश करून, सिनेलाइन इंडिया लि.ने विविधतेसह मूव्हीमॅक्स विस्तारासाठी ताकदीने सज्ज झाली. कनाकिया समूहाचा एक भाग म्हणून, नाशिक येथील प्रिमियम सिनेलाइन मल्टिप्लेक्स, मूव्हीमॅक्स आता ग्राहकांच्या मागणीनुसार प्रादेशिक स्तरावर नाशिकला चित्रपट प्रदर्शन व विविध सुविधात्मक उपक्रम उपलब्ध करत आहे. नाशिकला जसे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसे महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागात अशा प्रकारचे मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सिनेलाईनचे उद्दिष्ट आहे. समूहाचा थिएटरचा अनुभव अधिक समृध्द करण्यावर भर आहे.
महामारीच्या काळात चित्रपट प्रदर्शनाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत होते. लॉकडाऊननंतर वैविध्यपूर्ण चित्रपट आणि त्याच्याशी निगडीत उद्योगांना व्यासपीठ खुलं झालं आहे. नाशिक येथील सकारात्मक शुभारंभानंतर महाराष्ट्रात इतर आठ ठिकाणी मूव्हीमॅक्सने चित्रपट प्रदर्शन व्यवसायात यशस्वीपणे पाऊल टाकले आहे. नाशिकमध्ये मराठी चित्रपटांची उत्सुकता वाढल्याने, ही मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या धर्मवीर आणि समरेणू हे चित्रपट प्रदर्शित करत आहेत. याव्यतिरिक्त येथे बॉलीवूड हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत, तसेच प्रीमियम सुविधा उपलब्ध करून देत चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक उंचीवर नेण्याचा मूव्हीमॅक्सचा प्रयत्न आहे, त्यामुळे हे विविध चित्रपटांसाठी एक चांगले व्यासपीठ ठरणार आहे.
या प्रयत्नाविषयी बोलताना, चेअरमन श्री.राकेश कनाकिया म्हणाले “विविध चित्रपट उद्योगांना प्रोत्साहन देत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्यांना व्यासपीठ ऊपलब्ध करून दिल्याचा आनंद होत आहे. आम्हाला वाटते की, हे आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या योग्य पाऊल आहे. लॉकडाऊननंतर प्रादेशिक चित्रपट मोठ्या पाइपलाइनमध्ये असल्याचे लक्षात आले आहे. आमच्या थिएटरमध्ये प्रत्येक प्रदेशातील प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार सुविधा देण्याचा आणी प्रादेशिक चित्रपट उद्योग अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
