Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करू ; आंदोलन न करण्याची अधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांना विनंती

नाशिक| नाशिक मुंबई रस्ता दि.६ नोव्हेंबर पर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल. तो पर्यंत आंदोलन करू नये अशी विनंती नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यानुसार छगन भुजबळ यांची ही विनंती मान्य करत उद्या आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला असून दि.६ नोव्हेंबर पर्यंत अधिकाऱ्यांना वेळ वाढवून दिला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर दि.३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. तसेच दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. तसेच आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा भुजबळ फार्म येथील अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला. यावेळी नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन...

दिवाळीनिमित्त नातेवाईकांच्या भेटीने बंद्यांना मिळतेय बळ

नाशिकरोड | दिपावलीच्या सुट्यांमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांची  गर्दी होत आहे. बाकीच्या वेळी दिवसाला ६० ते ७० नातेवाईक बंद्यांना भेटायला येतात. दिवाळीत हीच संख्य दुप्पट झाली आहे.  आई, वडिल, पत्नी, मुलांशी थोड्या वेळ झालेल्या प्रेमाच्या चर्चेमुळे, त्यांनी दिलेल्या दिवाळ सणांच्या कपड्यांमुळे बंद्याना शिक्षा भोगण्यास, जगण्यास आत्मिक व शारिरीक  बळ मिळत आहे. डोळ्यातून गंगा- जमुना वाहिल्यामुळे टेन्शन कमी झाल्याने आरोग्याही ठिक राहात आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तीन हजारवर बंदी आहेत. त्यात शिक्षा सुनावलेल्या (पक्क्या) आणि खटल्याची सुनावणी सुरु असलेल्या (कच्च्या) बंद्यांचा समावेश आहे. पक्क्या बंद्यांना रोजगार देण्यासाठीसाठी नऊ छोटे कारखाने कारागृहात आहेत.  त्यात बेकरी, सुतारकाम, लोहारकाम, रसायन, मूर्तीकाम, चर्मद्योग, विणकाम आदींचा समावेश आहे.  या व्यतीरिक्त कारागृहाची शंभर एकर शेती आहे.  कारखाने व शेतीत बंद्यांना काम दिले जाते. या कामाबद्दल बंद्यांना कायद्यानुसार वेतन दिले जाते. या बंद्यांना दोन वेळचे भोजन, औषधोपचार, कॅन्ट...

रेशन दुकानदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक

नाशिक|  ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकीपर फेडरेशन पुणे यांची राज्यातील  रास्त भाव दुकानदार यांच्या विविध अडीअडचणी संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत मंत्रालयात दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वा. बैठक होणार आहे. बैठकीला राज्यध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांच्यासह ५ प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली आहे. कापसे म्हणाले की, या महिन्यातील धान्य अजूनही मिळाले नाही, त्यातच आनंदाचा शिधा अजून बऱ्याच दुकानदारांना प्राप्त नाही. मशीनला येणारी (नेटवर्क) अडचण यामुळे मागील महिन्याचे धान्य प्राप्त होऊन वितरणात आलेली बाधा. तसेच मागच्या व या महिन्याचे धान्याला मुदतवाढ मिळावी या व इतर मागण्यांसंदर्भात प्रधान सचिव यांच्या समवेत मंत्रालयात बुधवार दि. २ नोहेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता बैठक होणार आहे. अशी माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी दिली.

आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन

नाशिक|सौंदर्य शास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची कवाडे नाशिककरांसाठी खुली करून देणाऱ्या आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. ३०) ‘फॅशन शास्त्र 2022’ या मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणाऱ्या या इव्हेंटच्या मोफत प्रवेशिका फॅशन प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . यासंदर्भात माहिती देताना अकॅडमीच्या संस्थापिका तथा व्यवस्थापकीय संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सांगितले, ‘फॅशन शास्त्र 2022’ कार्यक्रमाचे औचित्य साधून १२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अप्सरा या थीमवर आधारित फॅशन शो उपस्थितांना स्वर्गीय सौंदर्याच्या मॉडेल्सचे दर्शन घडवेल. यानिमित्त प्रथमच नाशिककरांना वैविध्यपूर्ण सौंदर्यवतींचे पदलालित्य अनुभवयास मिळणार आहे. याप्रसंगी मराठी, मुस्लीम, राजवाडी, बंगाली, क्याथलिक, दाक्षिणात्य, मणिपुरी आदी श्रेणींतील ब्रायडल लुक देखील वेगळेपण अधोरेखित करतील. या कार्यक्रमात रशिया, कोरिया, युक्रेन, दुबई आदी ठिकाणच्या मॉडेल्स आपापल्या अविष्काराचे सादरीकरण करणार असल्याचे भाग्यश्री धर्माधिक...

प्रत्येक गावात एक डिजिटल अंगणवाडी होणे ही काळाची गरज: रामदास चारोस्कार

दिंडोरी| बालवयातच बालकांना सुसंस्कारीत केले व त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून बालपणापासून शाळेत येण्याची गोडी निर्माण केल्यास उद्याची सुसंस्कारीत पिढी त्यातून निर्माण होईल, तसेच प्रत्येक गावात डिजिटल अंगणवाडी  होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मा. आ. रामदास चारोस्कर यांनी काल येथे केले.   नाशिक पंचवटी येथील श्री गजानन महाराज पतसंस्था विद्यमाने संस्थेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम निधीतून केलेल्या डिजिटल अंगणवाडी उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालकाचा बौद्धिक पाया ज्या वयापासून सुरु होतो त्याच वयात त्यांच्या सर्वागीण बौद्धिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी बालवयातच अशा अंगणवाडीची नितांत गरज असते.अशा या शैक्षणिक कार्याची सुरुवात श्री गजानन महाराज पतसंस्थेने केली हे भूषणावह आहे. याप्रसंगी डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटक नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री नारायण शेठ वाजे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून  महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका डॉ. सौ अंजलीताई पाटील, उपाध्यक्ष के क...

रेशन सर्व्हर समस्या: शासनाकडून रेशन दुकानांना भेटी देण्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक| सर्व्हरच्या अडचणीमुळे ईपॉस मशिनद्वारे धान्य वितरणात बाधा उत्पन्न होत असल्याने शिधापत्रिका धारकांना ताटकळत उभे राहावे लागत होते, अखेर शासनाने सर्व्हरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दाखल घेत अधिकाऱ्यांना स्वस्त दुकांनाना भेटी देऊन त्याबाबत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान याबाबत उपसचिव यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे.  तसेच रेशन संघटनेने (nic) 'एनआयशी' सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असता त्यांच्याकडून 3 जी नेटवर्क वरून 5 जी नेटवर्कवर कनेक्टव्हिटी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे असे, महाराष्ट्र फेडरेशनचे राज्यध्यक्ष गणपत डोळस पाटील व सचिव बाबुराव म्हमाने यांनी सांगितले असून आम्ही एनआयसीशी संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या अडचणींबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे डोळस व म्हमाने यांनी स्पष्ट केले. धान्य वितरणास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 ची धान्य वितर...

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान: छगन भुजबळ

नाशिक| सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच पत्राद्वारे केली होती अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली. छगन भुजबळ यांच्यासोबत आज नाशिक येथील कार्यालयात माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर २०२१ मध्ये भारतसरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी २२ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकल्प नाशिकच्या ओझर मध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्व...

टाटा एअरबसचा प्रकल्प ही गुजरातला

मुंबई| वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकलपानंतर एअरबसचा सयुक्तिक सी-२९५ (एमडब्लू) वायुसेनेसाठीच्या मालवाहू विमानाचा २२ हजार कोटींचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे,हा प्रकल्प मिहानमध्ये होणार असल्याची चर्चा होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातच्या बडोदा येथे गेल्यामुळे सरकारचे हे अपयश आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे, मात्र राज्याच्या उद्धोग मंत्र्यांनी हा प्रकल्प यापूर्वीच्या सरकारच्या काळातच निर्णय झाला असल्याचे सांगून आरोप फेटाळले . स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा हे संयुक्तिकपणे सी-२९५ हा वायुसेनेसाठी मालवाहू विमान बनविण्याचा प्रकल्प भारतात सुरू करत आहे.त्यामध्ये ५६ मालवाहू विमाने बनविण्यात येणार आहे. त्यापैकी १६ विमाने एअरबस तयार स्थितीत देणार असून उर्वरित ४० विमानांची बांधणी गुजरात मधील  बडोदा येथील प्रकल्पात करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार युवकांना नोकऱ्या मिळणार आहे. मिहान येथे हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा होती. परंतु ३० ऑक्टबरला पंतप्रधानाच्या हस्ते त्याच...

सर्वस्पर्शी’ची नियमितता कौतुकास्पद : डॉ. चंदनशिवे

नाशिक| मराठी साहित्यविश्‍वात शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासूनची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना आजही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. विशेष म्हणजे दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या अनेक संस्था मधल्या काळात बंद पडल्या असल्या, तरी नाशिकच्या तन्मय प्रकाशन सारख्या काही संस्थांतर्फे नियमितपणे दिवाळी अंक प्रकाशित केला जातो, ही निश्‍चितच गौरवास्पद बाब आहे. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या लोक कला विभागाचे प्रमुख व लोकप्रिय गायक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी येथे केले. येथील तन्मय प्रकाशनच्या ‘सर्वस्पर्शी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, अंकाचे संपादक व प्रकाशक ब्रिजकुमार परिहार, बागेश्री वाद्यवृंदचे संचालक व सर्वस्पर्शीच्या संपादक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चारूदत्त दीक्षित, तन्मय प्रकाशनचे ऑनलाईन मिडिया ‘पार्टनर दि ॲंकर न्यूज’चे संचालक दिगंबर मराठे, ज्येष्ठ कवी दत्तात्रय कोठावदे, ज्येष्ठ पत्रकार सुनील भास्कर, औरंगाबाद येथील श्री. पवार आदी व्यासपीठावर होते. श्री. दीक्षित यांनी प्रा. डॉ. च...

कृष्णाकाठ दिवाळी अंकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई| सांगली येथून प्रसिद्ध होणाऱ्या सांगली कृष्णाकाठ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थान येथे उत्साहात पार पडला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, माजी मंत्री व शिवसेना विभाग प्रमुख अनिल परब, पक्षप्रमुखांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे मिलिंद नार्वेकर, संपादक शंभोराज काटकर,शिवराज काटकर आदी उपस्थित होते. शिवसेनेतील घडामोडींची दाखल नेहमीच कृष्णाकाठने आपल्या अंकातून घेतली आहे. यंदाच्या दिवाळी अंकातून दिवंगत आप्पासाहेब काटकर यांच्या स्मृती जाग्या होतात असे मत उद्धवजी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. कृष्णाकाठचे संपादक शंभोराज काटकर यांनी अंकाबाबत माहिती दिली. युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या लेखाचे उद्धवजी आणि रश्मीताई ठाकरे यांनी कौतुक केले.

इस्रोचा दिवाळी धमाका: वनवेबच्या ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

मुंबई| इस्रो व एनएसआयएलद्वारे ३६ वनवेब उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. त्यासाठी LVM3 रॉकेट वापरून न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) साठी प्रथमच व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणामुळे सॅटेलाईटव्दारे इंटरनेट सेवा प्रदान केली जाणार आहे. Photo credit: ISRO इस्रो, एनएसआयएल आणि वनवेबद्वारे संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी, 23 ऑक्टोबर 2022 रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 12:07 वाजता रॉकेटने अंतराळात झेप घेतली. वनवेबचे उपग्रह रॉकेटपासून यशस्वीरित्या विभक्त झाले आणि 9 टप्प्यांमध्ये वितरित केले गेले. 1तास 15 मिनिटांच्या कालावधीत हे स्थापित करण्यात आले त्यानंतर सर्व 36 उपग्रहांच्या सिग्नल संपादनाची पुष्टी करण्यात आली. सर्व उपग्रह कार्यरत आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 36 वनवेब उपग्रहांसह LVM3 मल्टी-सॅटेलाइट मिशनचे  हे पहिले व्यावसायिक अभियान आहे. तसेच LVM3 हे लो अर्थ ऑर्बिट (LEO) प्रक्षेपण केलेले पहिलेे सहा टन वजनी क्षमतेचे भारतीय रॉकेट आहे.  

रेशन सर्व्हरची समस्या: शिधा किट मिळाल्याने कुणाची दिवाळी गोड तर कुणी तिष्ठत उभे

नाशिक| प्रतिनिधी| सर्व्हर डाऊन असल्याने रेशन धान्य दुकानदारांकडून शिधा किट वाटपात अडचणी येत आहे. सर्व्हर नॉट फाऊंड अशा प्रकारचा मशिनवर संदेश येत असल्याने दुकानदार हैराण झाले आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. शहरी भागात काही ठिकाणी वाटप सुरू आहे, मात्र ग्रामीण भागात वितरणात अडथळे येत आहे. शासनाने ऑफलाईन देण्याची घोषणा केली मात्र रेशन संघटनेने त्यास नकार देत सर्व्हरमध्ये सुधारणा करून नियमाप्रमाणे ऑनलाईन वाटप ठेवा अशी विनंती केली. राज्य शासनाने नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी किटची घोषणा केली. अंत्योदय आणि केसरी शिधापत्रिका धारकांना  तेल, चनाडाळ साखर आणि रवा असे शिधा किट देण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी शिधा पोहचल्या तर काही ठिकाणी प्रतिक्षा केली जात आहे. काही शहरी भागात किट वाटप सुरू आहे, तर ग्रामीण भागात नागरिकांना कीटची प्रतिक्षा आहे. त्यात थम मशिनवर सर्व्हर डाऊन असल्याचा मेसेज दिसत आहे. त्यामुळे शिधा वितरणात अडचणी येत आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना रेशनिंग दुकानाबाहेर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे.  शासनाने सर्व्हरमध्ये सुधारणा...

व्यापारी, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील: सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार

नाशिक| व्यापार उद्योगाला चालना देतानाच शेतीसाठी योग्य उपाय करून निर्यातीसंदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार दिले आहे. सीमाशुल्क आयुक्त अभय कुमार नागपूरच्या सीमाशुल्क आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी नाशिक कस्टम हाऊस ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष सी. एस. सिंग आणि त्यांच्या व्यवस्थापकीय समितीने त्यांचे स्वागत केले. सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार आणि अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार यांच्या सोबत निर्यातीला चालना देण्यासाठी आणि उद्योग व्यापार आणि शेतीला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली. व्यापार प्रतिनिधींनी मालवाहू उड्डाणाचा मुद्दा उपस्थित करून एअर कार्गो वाहतुकीसाठी उपाय योजना करण्याची मागणी केली, तसेच नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरियर हब म्हणून अधिसूचित केले गेले आहे, त्यावर चर्चा केली. यावी  सीमाशुल्क आयुक्तांनी केलेले सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनसह व्यापारी प्रतिनिधींनी त्यांचे मानले.

आयएसपी- सीएनपी प्रेस कामगारांच्या ४८ वारसांना अखेर नोकरीत सामावून घेतले

नाशिकरोड| प्रतिनिधी|  नाशिकरोड येथील आयएसपी प्रेस मजदूर संघाच्या अथक प्रयत्नामुळे इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील 22 तर नोट प्रेसमधील 26 मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात आले. वीस वर्षानंतर अशी भरती प्रथमच झाल्याने कामगारांनी स्वागत केले. वारसांना कामावर रुजू करून घेण्याचा कार्यक्रम प्रेसच्या युएस जिमखान्यावर आज धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावर झाला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, सीएनपीचे बोलेवर बाबू, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, प्रविण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, सहसचिव संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, अशोक जाधव, राजू जगताप, इरफान शेख, राहुल रामराजे, बबन सैईद, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, अन्ना सोनवणे, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष कुलथे, सचिन दिवटे, देवीदास गोडसे, आयएसपीचे महाव्यवस्थापक व्यंकटेश कुमार, विनोद महारिया, सीएनपीचे उपमहाव्यवस्थापक नवीन कुमार आदींची प्रमुख उपस्थिती  होती. मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर प्रेसमध्ये कामावर ...

शिधा पत्रिकाधारकांना पॅकेज त्वरित मिळावे

नाशिकरोड| प्रतिनिधी |राज्य शासनाने शिधापत्रिका धारकांसाठी दिवाळीनिमित्त चार वस्तूंचे पॅकेज जाहीर केले आहे. ते सर्व शिधा पत्रिकाधारकांना लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.   महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोद बागुल, चंद्रकात भालेराव, देवळाली केम्प शहराध्यक्ष पंडित साळवे, दिनेश आहिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश गायकवाड यांनी शिधा पत्रिकाधारकांना पॅकेज लवकर पुरविण्याचे आश्वासन दिले.

दिव्यांगांनी तयार केलेले साहित्य विक्रीस

नाशिकरोड|प्रतिनिधी| नाशिकरोड येथील विकास मंदिर मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी पणत्या व इतर सजावट सहित्य तयार केले आहे. ते उपनगर येथील युगांतर सोशल फाउंडेशनच्या शांतीपार्क कार्यालयात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. विक्रीचा शुभारंभ माजी नगरसेविका सुषमा पगारे ,  युगांतरचे अध्यक्ष रवि पगारे, विकास मंदिरच्या शिक्षिका घोड़के यांनी केला. नागरिकांनी हे साहित्य खरेदी करून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सुषमा पगारे यांनी केले आहे.

अवजड वाहनांना दिवसा बंदी घाला युवक राष्ट्रवादीचे निवेदन

नाशिक| शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका बघता नाशिक शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. मागील आठवड्यात फेम सिग्नल येथून औरंगाबाद महामार्गावर वळविण्यात आलेल्या अवजड वाहनाच्या अपघातामुळे आई व मुलगा यांचे दुखद निधन झाले होते. या मार्गावरील अवजड वाहनांच्या विरोधात स्थानिकांनी अनेकदा निवेदने देऊन या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करून आंदोलने केले आहे.  नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाहनधारकांची संख्या वाढल्याने रहदारीमध्ये वाढ झाली आहे. त्याकारणाने रस्त्यांची संख्या कमी पडू लागली आहे. मुंबई, पुणे या शहरानंतर नाशिकचा क्रमांक येत असल्याने मुंबई-पुणे शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका होऊ नये याकरिता मेट्रो सिटीप्रमाणे अवजड वाहनांना वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. अवजड वाहने नाशिक शहरातील रिंग रोड वरून वळविण्यात आल्याने लहान वाहने पर्यायी मुख्य मार्गाचा वापर करतात. परंतु या मुख्य मार्गावर सिटी बस, खाजगी बस व बांधकाम मालवाहतूक अव...

इगतपुरी-भुसावळ मेमू दि. 18, 19 रोजी रद्द

नाशिकरोड| प्रतिनिधी|  चाळीसगाव स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे  गाडी क्रमांक  11120   भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वेगाडी मंगळवारी (दि. 18 )    व गाडी क्रमांक  11119  इगतपुरी-भुसावळ ही गाडी बुधवारी (दि. 19 )  रद्द करण्यात आली आहे. रेल्वेने ही माहिती दिली आहे.  मुंबईला जाणा-या पुढील गाड्या रेग्युलेट करण्यात आल्या आहेत.  11078 ( जम्मू तावी-पुणे) वाघळी स्टेशनवर  08.15  ते  11.25   पर्यंत.  12142  पाटलीपुत्र-एलटीटी   कजगाव स्टेशनवर  08.30  ते  11.25  पर्यंत,  15065 ( गोरखपूर-पनवेल) गालन स्टेशनवर  08.40  ते  11.25  पर्यंत,  11056  गोरखपूर-एलटीटी   पाचोरा स्टेशनवर  08.45  ते  11.25  पर्यंत,  12780  निजामुद्दीन - वास्को माहेजी स्टेशनवर  09.50  ते  11.25  पर्यंत १५०१८ गोरखपूर-एलटीटी शिरसोली स्थानकावर १०.२५ ते ११.२५ पर्यंत,  15646  गुहाटी-एलटीटी जळगाव स्टेशनव...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दि. २१ ऑक्टोबरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नाशिकरत्न पुरस्काराने सन्मान

नाशिक| जिल्हयाच्या निर्मितीस यंदा १५१ वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने यंदाचे वर्ष हे जिल्हयाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. नाशिकच्या या अभुतपूर्व वाटचालीचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा उलगडवून सांगतानाच तो सर्वांसमोर यावा याकरीता नाशिक न्यूजच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यानिमित्ताने (दि. २१) रोजी आयोजीत या सोहळयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने नाशिकच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्‍या मान्यवरांना नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  नाशिक जिल्हा निर्मितीची १५१ वर्ष आणि जनसामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार्‍या नाशिक न्यूज या वृत्त वाहिनीचा ११ वर्धापनदिन असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. जिल्हयाने इतिहास, भूगोल, शास्त्र, भाषा, कृषी, उद्योग,व्यापार या सर्वच  विषयांत वास्तविकतेत आपला स्वतःचा उच्चतम दर्जा निर्माण करून एक वेगळे उदाहरण जिल्ह्याच्या रुपाने जगासमोर उभे आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिट...

एक तरी छंद जोपासावा: चेतन राजापूरकर

छंद मानसिक तणाव दूर करण्यासाठी सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या  जीवनशैलीत अनेकदा मानसिक तणाव निर्माण होत असतो आणि हा तणाव आपले मानसिक खच्चीकरण करीत आहेत. मनावरील तणाव हा घटक आपल्या जीवनशैली प्रतिकूल परिणाम करीत असतो तणावामुळे आपली आनंदी जीवन जगण्याची आपली क्षमता कमी होते व आपली एकाग्रता कमी होते. सध्याच्या या स्पर्धात्मक वातावरणात आपण मानसिक तंदुरुस्त असणे जास्त गरजेचे असते अश्यावेळी नैराश्यने व तनावाने ग्रासलेला आपल्या मेंदूला सकारात्मक प्रवाहात आणण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडतो तो म्हणजे आपला छंद  मग तो कुठलाही असो अगदी काहींना आगपेट्यांचे कव्हर तर काहींना रिकाम्या बाटल्यांचे झाकण पोस्टल स्टॅम्प तर काहींना प्राचीन नाणे छंद म्हणजे आपल्या फावल्या वेळात काहीतरी विशिष्ट वस्तू व त्याचे विविध प्रकार जमवतो त्याचा अभ्यास करतो ते करीत असताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत असतो. त्याला छंद म्हणतात . छंद जोपासणारा व्यक्ती कधीच मानसिक तणावाला बळी पडत नसतो तो त्याच्या छंदात इतका एकरूप झालेला असतो की त्याला तो जगातील सर्व दुःख विसरतो जगण्याचा खरा आनंद घेत असतो  आजच्या तणावाच्या ...

बाळासाहेबांनी उभे केले आणि पवारसाहेबांनी मार्ग दाखविला: भुजबळ

मुंबई|बाळासाहेब व पवारसाहेब हे दोन्ही मोठ्या मनाचे नेते आहे. बाळासाहेबांनी मला झोपडपट्टीतून पुढे आणत मुंबईचे महापौर केले. तर पवार साहेबांनी समता परिषदेची नेहमी पाठराखण करत माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पवार साहेबांनी शिवतीर्थावर उभ करुन मंत्रीपद दिले. माझ्या ऐवढा भाग्यवान राजकारणी नेता या देशात दुसरा कोणी नसेल असे सांगत रचनात्मक काम कसे करायचे हे पवारसाहेबांकडून शिकलो असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना छगन भुजबळ बोलत होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या ६१ ची कार्यक्रम हा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडला. त्यात शरदचंद्र पवार साहेब, फारूक अब्दुल्ला हे उपस्थित होते. मात्र आज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी मंत्री गोपीनाथ ...

छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते: उद्धव ठाकरे

मुंबई| भुजबळ यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा व भुजबळांचा अमृतमहोत्सव हा योगायोग म्हणावा लागेल. कोणी तीन वर्षांपुर्वी सांगितले असते या सोहळ्याला मी उपस्थित राहिल तर कोणाचा विश्वास बसला नसता. पण नियतीच्या मनात हेच होतं. आज प्रत्येकाच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. भुजबळ शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले. अजीत पवार यांनी सांगितले की भुजबळ सरकार वाचविण्यात वाकबगार आहे. हे तेव्हाच सांगायचे होते. कामाला लावले असते असे म्हणताच सभागृहात हस्याचे फवारे उडले.  ते म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यातून सावरायला मोठा वेळ लागला. पण नंतर बर झालं तुम्ही मातोश्रीवर येत हे मतभेद मिटवले. हे पहायला मा हव्या होत्या असे सांगत. भुजबळ हे वयाने तरुण आहेत. सेनेमध्ये असताना कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्यांनी जिद्दिने वाटचाल केली. अडीच वर्षांपुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग देशाने पाहिला. तुमचे मार्गदर्शन लाभले. पण सध्या वैचारीक उंची पहायला मिळत नाही. वैचारीक एफएसआय जादा असायला हवा. ...