मुंबई| इस्रो व एनएसआयएलद्वारे ३६ वनवेब उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. त्यासाठी LVM3 रॉकेट वापरून न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) साठी प्रथमच व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणामुळे सॅटेलाईटव्दारे इंटरनेट सेवा प्रदान केली जाणार आहे.
इस्रो, एनएसआयएल आणि वनवेबद्वारे संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी, 23 ऑक्टोबर 2022 रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 12:07 वाजता रॉकेटने अंतराळात झेप घेतली.
वनवेबचे उपग्रह रॉकेटपासून यशस्वीरित्या विभक्त झाले आणि 9 टप्प्यांमध्ये वितरित केले गेले. 1तास 15 मिनिटांच्या कालावधीत हे स्थापित करण्यात आले त्यानंतर सर्व 36 उपग्रहांच्या सिग्नल संपादनाची पुष्टी करण्यात आली. सर्व उपग्रह कार्यरत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

36 वनवेब उपग्रहांसह LVM3 मल्टी-सॅटेलाइट मिशनचे हे पहिले व्यावसायिक अभियान आहे. तसेच LVM3 हे लो अर्थ ऑर्बिट (LEO) प्रक्षेपण केलेले पहिलेे सहा टन वजनी क्षमतेचे भारतीय रॉकेट आहे.