मुंबई| सांगली येथून प्रसिद्ध होणाऱ्या सांगली कृष्णाकाठ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थान येथे उत्साहात पार पडला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, माजी मंत्री व शिवसेना विभाग प्रमुख अनिल परब, पक्षप्रमुखांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे मिलिंद नार्वेकर, संपादक शंभोराज काटकर,शिवराज काटकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेतील घडामोडींची दाखल नेहमीच कृष्णाकाठने आपल्या अंकातून घेतली आहे. यंदाच्या दिवाळी अंकातून दिवंगत आप्पासाहेब काटकर यांच्या स्मृती जाग्या होतात असे मत उद्धवजी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. कृष्णाकाठचे संपादक शंभोराज काटकर यांनी अंकाबाबत माहिती दिली. युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या लेखाचे उद्धवजी आणि रश्मीताई ठाकरे यांनी कौतुक केले.


