नाशिक| मराठी साहित्यविश्वात शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासूनची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना आजही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. विशेष म्हणजे दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या अनेक संस्था मधल्या काळात बंद पडल्या असल्या, तरी नाशिकच्या तन्मय प्रकाशन सारख्या काही संस्थांतर्फे नियमितपणे दिवाळी अंक प्रकाशित केला जातो, ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या लोक कला विभागाचे प्रमुख व लोकप्रिय गायक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी येथे केले.
येथील तन्मय प्रकाशनच्या ‘सर्वस्पर्शी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, अंकाचे संपादक व प्रकाशक ब्रिजकुमार परिहार, बागेश्री वाद्यवृंदचे संचालक व सर्वस्पर्शीच्या संपादक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चारूदत्त दीक्षित, तन्मय प्रकाशनचे ऑनलाईन मिडिया ‘पार्टनर दि ॲंकर न्यूज’चे संचालक दिगंबर मराठे, ज्येष्ठ कवी दत्तात्रय कोठावदे, ज्येष्ठ पत्रकार सुनील भास्कर, औरंगाबाद येथील श्री. पवार आदी व्यासपीठावर होते. श्री. दीक्षित यांनी प्रा. डॉ. चंदनशिवे यांचे स्वागत केले. श्री. मराठे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. डॉ. चंदनशिवे म्हणाले की, सर्वस्पर्शीसारख्या दिवाळी अंकातून श्री. परिहार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, सर्वस्पर्शी दिवाळी अंकाचे यंदा बारावे वर्ष असून, संपूर्ण राज्यभर अंकाचे सभासद आहेत. तसेच, यापुढे दिवाळी अंकाची व्याप्ती वाढवून सर्वस्पर्शी या नावानेच संस्था स्थापन करत असल्याचे व त्यासाठी मार्च २०२३पर्यंत सभासद नोंदणी सुरू असून, इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन श्री. परिहार यांनी या वेळी सांगितले. सर्व उपस्थितांना अंकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.
