मुंबई| वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकलपानंतर एअरबसचा सयुक्तिक सी-२९५ (एमडब्लू) वायुसेनेसाठीच्या मालवाहू विमानाचा २२ हजार कोटींचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे,हा प्रकल्प मिहानमध्ये होणार असल्याची चर्चा होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातच्या बडोदा येथे गेल्यामुळे सरकारचे हे अपयश आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे, मात्र राज्याच्या उद्धोग मंत्र्यांनी हा प्रकल्प यापूर्वीच्या सरकारच्या काळातच निर्णय झाला असल्याचे सांगून आरोप फेटाळले.
स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा हे संयुक्तिकपणे सी-२९५ हा वायुसेनेसाठी मालवाहू विमान बनविण्याचा प्रकल्प भारतात सुरू करत आहे.त्यामध्ये ५६ मालवाहू विमाने बनविण्यात येणार आहे. त्यापैकी १६ विमाने एअरबस तयार स्थितीत देणार असून उर्वरित ४० विमानांची बांधणी गुजरात मधील बडोदा येथील प्रकल्पात करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार युवकांना नोकऱ्या मिळणार आहे. मिहान येथे हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा होती. परंतु ३० ऑक्टबरला पंतप्रधानाच्या हस्ते त्याचे गुजरात येथे उद्घाटन होणार आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारून सरकारचे हे अपयश असल्याचा आरोप केला आहे. एका मागून एक प्रकल्प गुजरातला जात असल्याने विरोधक आक्रमक झाले आहे. उद्धोगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाचा निर्णय यापूर्वीच्या सरकारच्या काळात झाला असल्याचे सांगून विरोधकांचे आरोप फेटाळले.
महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार गुजरातला मिळणार
२० बिलियन डॉलरच्या वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पानंतर २२ हजार कोटींचा टाटा एअरबसचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. शिंदे फडणवीस सरकारचे हे मोठे अपयश असून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हजारो युवकांना मिळणारा रोजगार गुजरात येथे हलविण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करत आहे.
पुरूषोत्तम कडलग
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश
