नाशिक| व्यापार उद्योगाला चालना देतानाच शेतीसाठी योग्य उपाय करून निर्यातीसंदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार दिले आहे.
सीमाशुल्क आयुक्त अभय कुमार नागपूरच्या सीमाशुल्क आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी नाशिक कस्टम हाऊस ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष सी. एस. सिंग आणि त्यांच्या व्यवस्थापकीय समितीने त्यांचे स्वागत केले. सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार आणि अतिरिक्त आयुक्त निलंक कुमार यांच्या सोबत निर्यातीला चालना देण्यासाठी आणि उद्योग व्यापार आणि शेतीला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली.
व्यापार प्रतिनिधींनी मालवाहू उड्डाणाचा मुद्दा उपस्थित करून एअर कार्गो वाहतुकीसाठी उपाय योजना करण्याची मागणी केली, तसेच नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरियर हब म्हणून अधिसूचित केले गेले आहे, त्यावर चर्चा केली.
यावी सीमाशुल्क आयुक्तांनी केलेले सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनसह व्यापारी प्रतिनिधींनी त्यांचे मानले.

