नाशिक| प्रतिनिधी| भारतीय वाईन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने जगदीश होळकर यांची निवड करण्यात आली आहे. (AIWPA) 'एआयडब्लूपीए'च्या व्यवस्थापकीय समिती सदस्यांची बैठक नाशिक येथील सोमंदा वीनयार्ड आणि रिसॉर्ट येथे झाली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 |
| अध्यक्ष: जगदीश होळकर |
 |
| सचिव: राजेश जाधव |
 |
| कोषाध्यक्ष: राजेश बोरसे |
जगदीश होळकर हे भारतातील वाईन क्षेत्रातील अभ्यासू तज्ज्ञ म्हणून देशविदेशात परिचित असून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. संघटनेची कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे उपाध्यक्षपदी श्रीमती प्रियंका सावे तर सचिव म्हणून राजेश जाधव आणि कोषाध्यक्षपदी राजेश बोरसे यांची निवड करण्यात आली. प्रियंका सावेंच्या रुपाने संघटनेत पहिल्यांदाच एका महिला उद्योजिकेची निवड झाली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल सर्व व्यवस्थापकीय समितीची सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचे नीरज अग्रवाल आणि सदाशिव नाठे यांनी आभार मानले.