नाशिक| गंगापूर येथे राहणाऱ्या सौ.जिजाबाई पाटील (७५) यांच आज अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा श्रीनिवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुली, मुलगा, पुतण्या, भाऊ असा मोठा परिवार आहे. गंगापूर अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. त्यावेळी श्रीनिवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी मंडळाने ही श्रद्धांजली वाहिली.
