Skip to main content

भविष्यात नाशिक देशाची लाॅजेस्टिक कॅपिटल व्हावी: नितीन गडकरी

नाशिक|प्रतिनिधी| काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारे नाशिक हे मध्यवर्ती स्थान आहे. त्यासाठी आता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी भाजा, फळे, अौषध साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज बनवले पाहिजे. जेणेकरुन माल खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतूक करणे सोपे होईल.  ज्यामुळे वाहतूकीचा खर्च कमी होईल व इंधनाची बचत होईल. देशातील मध्यवर्ती स्थान पाहता भविष्यात नाशिक देशाची लाॅजेस्टिक कॅपिटल व्हावी व त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Nashik-to-be-logistics-capital-of-country-in-future-Nitin-Gadkari
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात मे महिन्यात ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शनिवारी ( दि.१८) महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे.  त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनल बनवल्याने साडेतीन तासाचा रस्त्याचे अंतर साडेआठ मिनिटावर आले. तसेच लेह लडाख मार्गामुळे अंतर वाचणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे. इंधन म्हणून डिजेलचा पर्याय सर्वात महागडा व प्रदूषणकारी आहे. त्याऐवजी एलपीजी, सीएनजीचा स्वस्त व प्रदूषण विहरीत पर्याय उपलब्ध आहे. टाटा, अशोक ली लॅण्ड या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक ट्रक निर्माण केले जात आहे. भविष्यात हायड्रोजनवर चालणारे ट्रक बनवले जाणार आहे.तसेच इंधन म्हणून  बायो डिझेल, मिथेनाॅल हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. 

जैविक इंधन तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी संधी आहे. मी स्वत:च्या ट्रक्टरसाठी जैविक इंधन वापरुन वर्षाला एक लाखाची बचत केल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. भविष्यात लाॅजेस्टिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे त्यासाठी ट्रान्सपोर्ट इंड्रस्टीने तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते एक्स्पोच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.यावेळी ‘सारथी सुविधा केंद्र’ या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी, सचिव शंकर धनावडे, सेवा अॅटो मोबाईलचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव बाफना, जितेंद्र आॅटोमाबाईल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र शाह, , आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, ए.आय.एम.टी.सी चे अध्यक्ष अमृतलालमदन, दिल्ली अध्यक्ष मलकतसिंग बल, महाराष्ट्र महासंघ अध्यक्ष प्रकाश गवळी, बी.जी.टि.अे सचिव सुरेश खोसला आदीसंह सल्लागार समिती, पदाधिकारी व संघटनेचे सभासद उपस्थित होते.सूत्रसंचालन परी ठोसकर यांनी केले.

शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे

नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण बघता शहरात होणारी वाहनांची गर्दी व प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. द्वारका चौकातील वाहतून कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी पूल बांधला. आता आपण डबल डेकर पूल बांधत आहोत असे त्यांनी सांगितले. 

बक्षिस वितरण सोहळा

एक्स्पो उपक्रमांअंतर्गत मविप्र केबीटी अभियांत्रिकीब महाविद्यालयात ‘नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व पोस्टर सादर केले होते. त्यातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.


वाहतूक समस्यांवर उपाययोजना पॉवर पॉइंट स्पर्धा

प्रथम - अथर्व कातकडे दीपक पाटील,खुशाल जाधव, मनीषा पाटील विद्यार्थी ग्रुप

द्वितीय - श्याम हंडोरे जानवी पवार ऋचा वाल्हे विद्यार्थी ग्रुप

तृतीय - ऋषिकेश फाल्ले, जयेश काडव, अभिजीत चव्हाणके, सनी भिमानी विद्यार्थी ग्रुप

चतुर्थ - सावनी थेटे, अंशुला निरगुडे, तृप्ती बस्ते, ईशा नवरकर, सायली रुईकर

 सौंदर्य व विकास पर्यटन उपाययोजना पॉवर पॉइंट स्पर्धा

प्रथम - मानसी वाघ, पायल परदेशी, देवेश मोर्य, सुजित निकम, निकिता पाटील, आकाश रुले, ओम मुंडनकर विद्यार्थी ग्रुप


द्वितीय - देवयानी निकम, प्रणिता लोखंडे, शुभांगी सिंग, तेजस्विनी शिंदे, खुशबू नांदरे विद्यार्थी ग्रुप


तृतीय - प्रगती देसले, कांचन खैरे, निकिता हालदेर, श्लोका कोठावदे विद्यार्थी ग्रुप

चतुर्थ - शुभांगी सिंग, तेजस्विनी शिंदे, देवयानी निकम, प्रणिता लोखंडे, खुशबू नांदरे विद्यार्थी ग्रुप














Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...