Skip to main content

महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष गाड्या; असा असेल टाईमटेबल

नाशिक रोड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. 


नागपूर ते मुंबई विशेष गाड्यांचा तपशील- गाडी क्र. ०१२६२ ही ४ डिसेंबरला नागपुरहून २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई सीएसटी येथे दुस-या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.  गाडी क्र. ०१२६४ ही ५ डिसेंबरला नागपूरहून ०८ वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२६६ ही ५ डिसेंबरला नागपुरहून १५.५० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी १०.५५  वाजता पोहोचेल. थांबे अजनी,  सेवाग्रामवर्धाअकोलाजलंब,  मलकापुरभुसावळजळगांवचाळीसगांवमनमाडनाशिक रोडइगतपुरीकसाराकल्याण,  दादर. संरचना: सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे. 


अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष-

गाडी क्र. ०२०४० ही ७ डिसेंबरला नागपुरहून १३.२० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. थांबे - अजनीवर्धाबडनेराअकोलाशेगांवमलकापुरभुसावळनाशिक रोडइगतपुरीकल्याण आणि दादर. संरचना: सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे.

मुंबई ते नागपूर विशेष गाड्या- गाडी क्र. ०१२४९ ही ६ डिसेंबरला मुंबईहून १६.४५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबरला मुंबईहून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबरला दादरहून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.  गाडी क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबरला मुंबईहून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबरला मुंबईहून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबरला दादरहून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

     थांबे- दादरकल्याणकसाराइगतपुरीनाशिक रोडमनमाडचाळीसगांवजळगावभुसावळअको लामूर्तिजापूरबडनेराधामणगांवपुलगांववर्धासेवाग्राम. संरचना :  सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...