Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

आता ५०० रु. आरटीपीसीआर चाचणी होणार : आरोग्यमंत्री ना. टोपे

मुंबई| राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे...

बिटको रुग्णालयातील गैरसोयीची मनपाकडून दखल; स्थायी सभापती गितेंची पाहणी

नाशिक| गरीब व मध्यम वर्गीय कोरोना रुग्णांचा आधार ठरलेल्या महापालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय दूर करून सोई-सुविधा देण्याची मागणी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी निवेदनाद्वारे केली होती.  त्याच अनुषंगाने आज महापालिकेचे स्थायी सभापती गणेश गीते यांनी बिटको रुग्णालयाचा दौरा केला यात असे निदर्शनात आले अतिदक्षता विभागात संख्येपेक्षा जास्त रुग्ण असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता दिसून आली रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांच्याकडून त्याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच त्यांनी कर्मचारी व वैद्यकीय स्टाफ वाढवावा अशी स्थायी  सभापती गणेश गीते  यांच्याकडे करण्यात आली.

खा. शरद पवारांच्या फोटोसह ट्विट करून कन्या सुप्रिया सुळे काय म्हणाल्या..

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करून शरद पवार यांची प्रकृती स्थिर आल्याचे सूचित केल्याचे दिसते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "सुप्रभात , ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करीत आहेत.

अंबड १ तर उपनगर हद्दीत ६ आस्थापनांवर पोलिस- मनपाची संयुक्त कारवाई

नाशिक| शहरात रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आणि मनपा प्रशासन अँक्शन मोडमध्ये आहे. अंबड हद्दीत एक तर उपनगर हद्दीत सहा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते आणि मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. अंबड आणि उपनगर हद्दीत प्रत्येकी एक आस्थापना सील ही करण्यात आली. अंबड पोलीस ठाणे हद्दीत विभाग ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या  मार्गदर्शनाखाली अंबड पोलीसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत विनामास्क फिरणार्‍या ३२ लोकांवर दंडात्मक कारवाई करून १६,००० रूपये दंड गोळा करण्यात आला.  तसेच मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत पोलिसांकडून करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत सोशल डिस्टंसिंगच्या ९ केसेसच्या माध्यमातुन - ४५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच कामटवाडे येथील बालाजी किराणा दुकान हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत तसेच मंगळवारी म.न.पा. पथकासोबत विना मास्क  फिरणाऱ्या १६ लोकांवर कारवाई करण्यात आली, तर निर्बंधाचे पालन न करणाऱ्या ६ आस...

दिंडोरी लसीकरण केंद्राची खा.डॉ.भारती पवार यांच्याकडून पाहणी

नाशिक| सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खा. डॉ.भारती पवार यांनी दिल्ली येथील अधिवेशन आटोपून तात्काळ आपल्या मतदार संघातील कोविड सेंटर दिंडोरीची पाहणी केली. तेथील  कोविड-19 लसीकरण विभागाला भेट देत तेथे रुग्णांना लसीकरण करत असताना प्रत्यक्ष पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील यांच्याशी चर्चा केली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयमार्फत आत्तापर्यंत जवळपास ३५०० नागरिकांना लस देण्यात आली आहे. या कामाबद्दल खा. डॉ.भारती पवार यांनी संपूर्ण कर्मचारी वर्गाचे आभार मनात समाधान व्यक्त करून पुष्प गुच्छ देऊन सत्कार देखील केला. , त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांनी देखील व्हॅक्सिनेशन सेंटर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, भास्कर खराटे, ग्रामीण रुग्णालय दिंडोरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, डॉ.काळे, नर्सेस यांसह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

निफाडच्या द्राक्ष उत्पादकांवर कारवाई होणार म्हटल्यावर मा.आ. कदमांचा थेट मातोश्रीवर संपर्क...नेमका काय आहे प्रकार वाचा!

संतोष गिरी निफाड| मुंबईत शिवाजी पार्क येथे निफाडच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष स्टॉल लावला होता, पण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी स्टॉल लावण्यास मज्जाव केला. स्थानिक बाजारात भाव नाही, मुंबईत विक्रीसाठी आलेली द्राक्ष विकू दिली जात नाही अशा द्विधा मनस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी थेट माजी आ. अनिल कदम यांच्याकडे कैफियत मांडली, मग काय कदम यांनी थेट मातोश्रीवर संपर्क करत या घटनेची कल्पना दिली. लागलीच शिवसैनिकांनी याठिकाणी धाव घेत कारवाई टाळली आणि द्राक्ष विक्रीसाठीची व्यवस्था करुन दिली कदम यांच्या पुढाकाराने त्यामुळे निफाडच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला . महाराष्ट्रातील निफाड तालुका हा देशातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो तसेच द्राक्षपंढरी म्हणूनही  ओळखला जातो. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागले आहे. सुजलाम  सुफलाम् समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या ज़िद्दीने कमावलेली निर्यातक्षम द्राक्षे क...

लासलगावला कांदा लिलाव सलग ५ दिवस बंद; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

संतोष गिरी  लासलगाव| सणासुदीचा काळ आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ५ तर धान्य लिलाव ७ दिवस बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असून सणासुदीला दोन पैसे गाठीशी बांधता येतील या आशेवर असलेले शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहे. दि . १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत होणार आहे. बाजार समिती शनिवारी, रविवार दिनांक २७ व २८ मार्च बंद, तर        सोमवार दिनांक २९ मार्च धुलीवंदन आणि मंगळवार  दि.३० आणि ३१ रोजी मार्च वर्ष अखेर लिलाव बंद राहणार असून गुरुवार दिनांक १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होतील. तसेच शुक्रवार दिनांक २ एप्रिल रंगपंचमी निमित्त समिती बंद असेल, तसेच सोमवार दिनांक २९ मार्च  २०२१ पासून शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ पर्यंत धान्य लिलाव बंद राहतील. सोमवार दिनांक ५ एप्रिल २०२१ पासून धान्य लिलाव पूर्ववत सुरू होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत.  कोरोनाचा कांदा उत्पादकांना फटका मार्च महिन्...

..अखेर सायखेड़ा गोदापात्रातील पानवेली काढण्यास सुरुवात; खंडू बोडके यांचे टाळे लावा आंदोलन स्थगित

संतोष गिरी निफाड| तालुक्यातील गोदाकाठच्या गोदापात्रात दोन महिन्यांपासून अडकलेल्या पानवेली काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र राज्य बियाने उपसमितीचे सदस्य, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या शिवसेना स्टाईल "टाळे लावा" आंदोलनाचा धसका घेत आज सोमवारी (दि.२९) पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यामुळे खंडू बोडके-पाटील यांनी उद्या मंगळवार (दि.३०) पासून जाहीर केलेले कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला "टाळे लावा" आंदोलन स्थगित केले आहे.  गोदापात्रातील पानवेलीमुळे साथीचे आजार फैलावल्याने गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पानवेली काढण्याची वारंवार मागणी करूनही पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडू बोडके-पाटील यांनी थेट कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या कार्यालयाला ३० तारखेला टाळे ठोकून सायखेडा पुलावर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी खंडू बोडके-पाटील यांना आंदोलन न करण्या...

बोकडदरे १००% कृषी वीज बिल भरणारे महाराष्ट्रातील अव्वल गाव

संतोष गिरी निफाड| तालुक्यातील पुर्व भागातील व येवला- लासलगाव या विधानसभा मतदार संघातील बोकडदरे येथे विंद्युत वितरण कंपनीने ग्रामसभा घेऊन कृषी विज धोरण २०२० ही योजना व गावाचा फायदा या बाबी समजावून सांगितल्या. तसेच बोकडदरे येथे विज बिल भरण्यासाठी चक्क स्पर्धा होऊन १८०  विज ग्राहकांनी बावीस लाख रुपये भरना करुन १००% विज बिल भरणा केल्याने हे गाव महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी दिली. ते नैताळे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.     महाराष्ट्रात सर्वत्र विज बिल भरणा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत, याचाच एक भाग म्हणून निफाड या उपविभागातील बोकडदरे येथे विद्युत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता बंकट सुरवसे व सहाय्यक अभियंता पुजा वाळुंज यांनी बोकडदरे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहुन कृषी विज धोरण २०२० ही योजना सांगून गावासाठी योजना किती फायद्यची आहे हे समजावून सांगितले होते. बोकडदरे ग्रामस्थानी योजना समजून घेतल्याने विज बिल भरणा करण्यासाठी चक्क स्पर्ध...

कामटवाडे येथील हॉटेल गंगोत्रीला पोलिसांनी ठोकले टाळे; १९ मद्यपींवर कारवाई

नाशिक| अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडे या ठिकाणी निर्बंधाचे पालन होत नसल्याने पोलिसांनी हॉटेल गंगोत्री बारवर करवाई करून सील ठोकले. त्यात १९ मद्यपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले असून धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहर परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या  सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते विभाग 3, गुुन्हेे शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व अंबड पोलीस ठाण्याचे अंमलदार याच्यासह नाशिक महानगरपालिका पथकासोबत संचलन करण्यात आले. तसेच निर्बंध न पाळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली, त्यात हॉटेल गंगोत्री बारवर छापा टाकून एकोणवीस लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी करण्यात आली, तसेच सदर हॉटेल गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.

एनसीपी प्रमुख खा.शरद पवार यांच्यावर ब्रीजकँडीत बुधवारी शस्त्रक्रिया

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार त्यांच्या पोटात दुखत असल्याने आणि थोडेसे अस्वस्थता जाणवल्याने आज त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. निदान झाल्यावर त्यांना त्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी दि. ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली आहे. फोटो:फाईल ब्रीज कँडी मध्ये काही तपासण्या केल्यावर समजले की त्याच्या पित्त मूत्राशयमध्ये एक समस्या आहे. त्यांना देण्यात येणारी औषधे थांबवली आहे, तसेच पुढील उपचारासाठी त्यांना 31 मार्च 2021 रोजी पुन्हा ब्रीज कँडी रुग्णालयात पुन्हा दाखल केले जाईल, एन्डोस्कोपी झाल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत त्याचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे, असे मलिक यांनी सोशल मीडियात ट्विट करून माहिती दिली आहे. 

राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने

मुंबई| राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणा-या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. फोटो:फाईल यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत- मृत्यूंची संख्या वाढू शकते या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणा-या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरो...

कोरोना निर्बंधांतून वाहतूक व्यवसायाला सूट द्या: ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या वेळेच्या निर्बंधांतून वाहतूक व्यवसायाला सूट देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडेय,मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. फोटो:फाईल त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात वाहतूक विभागाने दिवसरात्र सेवा देण्याचे काम केले आहे. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक निर्बंध घालण्यात आले असून वेळेची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. या मर्यादेचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या मर्यादा घातल्या ...

एफडीआय धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी ई- कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करा: कॅटची मागणी

नाशिक| ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्या भारतात ऑनलाईन व्यापार करतात त्याचा कोणताही लाभ  देशाला होत नसून हा सर्व नफा विदेशात जात आहे. या विदेशी कंपन्या आपल्या विक्रीच्या 80 टक्के वाटा मोजक्याच कंपन्यांना देतात ज्यामुळे देशातील विक्रेत्यांना याचा कोणताही फायदा होत नाही, उलट छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान या कंपन्यामुळे होत असून या कंपन्यांना भारतात ऑनलाइन व्यापार करण्यास बंदी आणावी या मागणीचा पुनर्रच्चार  कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे करून  त्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करतांना कॅटचे पदाधिकारी केंद्र शासनाच्या परकीय गुंतवणूक धोरणाअंतर्गत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, ई-पोर्टलवर माल मालविक्री करणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यास पूर्ण विवरण भरणे जरूरीचे आहे, परंतु ॲमेझॉनवर ऑर्डर बुक केली की ती सरळ अमेझानकडे जाते. ते आपल्या मर्जीप्रमाणे विक्रेता निवडतो. जे या धोरणाचे उल्लंघन आहे, याआधी शासनाला अवगत करण्यात आले आहे. त्यामुळे आता नविन आदेश काढून विदेशी कंपन्यांच्या मनमानीला चाप लावण्याकरता  नियमांचे उल्लंघन करण...

निफाड प्रशासन उतरले रस्त्यावर, संयुक्त धडक कारवाई

संतोष गिरी निफाड| तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुवारी  निफाड तालुक्यातील  नैताळेसह  निफाड तालुक्यात ठिकठिकाणी  विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर, तसेच गर्दी व नियम न पाळणाऱ्या दुकांनदारावर दंडात्मक कडक कारवाईची संयुक्त मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात  आली. या मोहिमेत निफाडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी  संदीप कराड, पोलिस निरीक्षक रंगराव सानप, पोलीस उपनिरीक्षक ए. एन.कोठळे, विस्तार अधिकारी के.टी. गादड, तलाठी एन.आर.केदार, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, खैरनार, राजेंद्र दहिफळे ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. नैताळे येथील कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या २ नागरिक व एका दुकानांवर ५४००/- रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली, तसेच गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आणि घ्यावयाच्या काळजी बाबत माहिती दिली. या मोहिमे दरम्यान महसूल,  पोलीस व ग्राम प्रशासनाच्या वतीने कोरोन...

निफाडसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत १ कोटी २० लाखाचा निधी: आ. दिलीप बनकर

संतोष गिरी निफाड| जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतीना जनसुविधा साठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येतेे, या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील सुमारे २३० ग्रामपंचायतीच्या कामांना प्रशासाकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी सुचविलेल्या सुमारे १ कोटी  २० लाख रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. दिलीपराव बनकर यांनी पत्रकारांना दिली. निफाड तालुक्यातील या ग्रामपंचायतींना  संबंधित निधी मंजूर झाला असून, त्यामध्ये ओणे येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, महाजनपूर येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, गोरठाण येथे स्मशानभूमी  अनुषंगिक कामे करणे १० लाख, नांदुर्डी येथे स्मशानभूमीत निवारा शेड बांधकाम करणे १० लाख, नारायणटेंभी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, बेहेड येथे  स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, पिंपळस येथे दशक्रियाविधी शेड बांधणे २० लाख, नैताळे  येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, वावी येथे दशक्रियाविधी शेड बांधणे १० लाख, शिंपीटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० ...

राज्यात १५ एप्रिलपर्यंत निर्बंध लागू

मुंबई|  राज्यामध्येरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फोटो: फाईल  राज्यात १५ एप्रिलपर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश २७ मार्च २०२१ पासून लागू करण्यात आलेला असून १५ एप्रिल पर्यंत अंमलात असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल. इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने व सागरी किनारे रात्री आठपासून सकाळी सात पर्यंत बंद असतील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना १५ एप्रिलपर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल ५० लोक तर अंतिम संस्कारासाठी २० लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी १५ एप्रिलपर...

बाधितांची संख्या कमी न झाल्यास लॉकडाऊन अटळ

नाशिक| कोरोनाकाळात सर्वांनी माणुसकीच्या भावनेतून व सामुहिक जबाबदारीने काम करावे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाबधितांची संख्या  अशीच वाढत राहिल्यास येत्या काही दिवसात लॉकडाऊन अटळ आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्याच्या झालेल्या कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलात होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, येवला प्रांतधिकारी सोपान कासार, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत खैरे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद पाटील, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री छगन भु...

सध्याचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णकाळ: डॉ. वरदराज बापट

नाशिक|प्रतिनिधी| पश्चिमात्य देशात साठ ते सत्तर टक्के अर्थव्यवस्था ही मोठ्या उद्योगांवर अवलांबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे साठ ते सत्तर टक्के लघुद्योग आहेत त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने नवउद्योजकांना   सध्या  मोठी संधी आहे. कोरोनाचे संकट असले तरी सध्याचा काळ नवउद्योजकासाठी सुर्वणकाळ असल्याचे मत वरदराज बापट यांनी  व्यक्त केले.  "भारतीय अर्थव्यवस्थे वरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल"  या विषयावर  शनिवारी  रोजी  आयोजित परिसवांदात डॉ  बापट बोलत होते.  या मध्ये  डॉ . आशुतोष रारावीकर (संचालक भारतीय रिजर्व बँक, अर्थतज्ज्ञ, डॉ. वरदराज बापट (इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि मुंबई, अर्थतज्ज्ञ), दिलीप शिनॉय  (सरचिटणीस एफ आय सी सी आय),  सचिन कुमार ( कार्यकारी संचालक टी एम एम ए), पद्मश्री  मिलिंद कांबळे ( संस्थापक अध्यक्ष डी आय सी सी आय ) आदी सहभागी झाले होते . विद्यार्थ्यांना कोर्पोरेट जगातील व्यवस्थापनाचा अनुभव या हेतूने विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते....

निफाडच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचके उतरल्या रस्त्यावर; कोरोना निर्बंध पाळण्याचे केले आवाहन

संतोष गिरी  निफाड| तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज निफाड नगरपंचायतीतर्फे एक मोठी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मास्क न घालणारे त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन न करणारे अशा नागरिकांवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात आली. एकूण 32 नागरिकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली.  तसेच एक किराणा मालाचे दुकान, एक चप्पल व बूट व्यवसायाचे दुकान या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करता मोठ्या प्रमाणात नागरिक छोट्या दुकानांमध्ये उभे असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईमध्ये निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह नगर अभियंता भालचंद्र क्षिरसागर, लेखापाल नितीन भवर, नगरपंचायतीचे कर्मचारी  काकुळते , कुंदे , धारराव,  भवर, राजू कापसे , राजू परदेसी, तुषार शिंदे त्याचप्रमाणे हर्षवर्धन मोहिते या सर्वांनी भाग घेतला होता. या सर्व कारवाईमध्ये दंड वसूल करणे हा या मागील हेतू नसून लोकांनी मास्क घालावे, नियम पाळावे, सामाजिक अंतराचे पालन करावे या गोष्टीची सक्ती करणं आणि त्यामुळे कोरोना...

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई| राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. २८ मार्च २०२१) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही श्री.ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्त...

१०८ ची सेवा सुरळीत करा, रूग्णवाहिकेची संख्या वाढवा: खा.डॉ.पवार

नाशिक| नाशिक जिल्ह्यातील पेठ, कनाशी, वणी, सटाणा, पिंपळगाव बसवंत, ननाशी या भागांत गेल्या काही दिवसांपासून ही सेवा बंद आहे. ही सेवा सुरळीत करण्यासोबत रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत गंभीररित्या पिडीत रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याच्या हेतूने १०८ अम्बुलन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे अतिदुर्गम आणि आदिवासी भागात या सेवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील पेठ, कनाशी, वणी, सटाना, पिंपळगाव बसवंत, ननाशी या भागांत गेल्या काही दिवसांपासून हि सेवा बंद आहे. कारणास्तव तेथील रुग्णांना १०८ अम्बुलन्सची अति आवश्यकता असताना देखील ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने पिडीत रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहचू शकत नाही, आणि अशा कारणास्तव रुग्णांचा मृत्यू देखील होतो. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विनंती केली कि, या विषयाचे पुनरावलोकन करून १०८ ची सेवा लवकरात ल...

निफाड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या गयाबाई सुपनर

संतोष गिरी निफाड|निफाड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी देवगाव गणाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या  सदस्या गयाबाई  सुपनर यांची बिनविरोध निवड आज निफाड पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली  या निवडीप्रसंगी 18 पैकी 12 सदस्य उपस्थित होते.  विद्यमान उपसभापतो संजय शेवाळे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर गयाबाई सुपनर यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शरद घोरपडे हे होते  या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती रत्नाताई  संगमनेरे, गयाबाई सुपनर, राजेश पाटील, सपना बागुल, पंडित अहेर ,शिवा सुरासे, संजय शेवाळे, सोमनाथ पांनगव्हाणे, सुलभा पवार, सोनाली चारोस्कर, कमल राजोळे, दिलीप सूर्यवंशी आदी १२ सदस्य उपस्थित होते. उपसभापतीपदी पदासाठी गयाबाई  सुपनर यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून शिवाजी सुरासे यांचे नाव होते गयाबाई  सुपनर  यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने उपसभापतीपदी गयाबाई  सुपनर यांची बिनवोरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केले निवडीनंतर उपसभापती गयाबाई  ...

नाशिक लॉकडाऊनचा निर्णय टळला; निर्बंध पाळा पालकमंत्र्यांचे शहवासीयांना पुन्हा आवाहन

नाशिक| नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडको परिसरातील रानाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरवात करत उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको,शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे  पाहणी करत जिल्हाधिकारी का र्यालय या भागात पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते. पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक य...